मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्यात एकूण सहा लोकसभा मतदार संघ असून या मतदार संघात अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचा-यांसाठी १४, १५ आणि १६ मे रोजी तीन दिवस टपाली मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदार संघातील नोंदणीकृत मतदारांपैकी अत्यावश्यक सेवेतील पोलिस अधिकारी कर्मचारी, अग्निशमन दल, वैद्यकीय सेवेतील कर्मचारी यांच्यापैकी त्यांनी विहित मुदतीत टपाली मत पत्रिकेसाठी नमुना १२ /१२ ड आणि ईडीसी कार्यप्रमाण पत्राकरीता नमुना १२ अ मध्ये अर्ज केला होता. जे कर्मचारी तपासणीअंती पात्र ठरले आहेत.
अशा १२ अ च्या पात्र कर्मचा-यांना ईडीसी प्रमाणपत्र वितरण करणे. नमुना १२ अ/ नमुना १२ ड भरलेल्या आणि पात्र ठरलेल्या मतदारांना टपाली मतपत्रिका वितरीत करुन टपाली मत पत्रिकांच्या मतदानाकरीता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर टपाली मतदानाची सुविधा १४ ते १६ मे रोजी दरम्यान सलग तीन दिवस सकाळी ९ ते सायंकाळी ५ यावेळेत उपलब्ध आहे..
मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी विक्रोळी येथील कार्यालयात १४ ते १६ मे या कालावधीत टपाली मतदान केंद्र कार्यरत असणार आहे. तर निवडणूक कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी विक्रोळी येथील कार्यालयात १७ ते १९ मे या कालावधीत मतदार सुविधा केंद्र कार्यरत असणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर यांनी दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.