कोरोनात आकस्मिक मृत्यू टाळण्यासाठी डॉक्टरांकडून वापरला जातोय 'हा' महत्त्वाचा पर्याय...

कोरोनात आकस्मिक मृत्यू टाळण्यासाठी डॉक्टरांकडून वापरला जातोय 'हा' महत्त्वाचा पर्याय...
Updated on

मुंबई : वरळीच्या 'नॅशनल सपोर्ट क्लब ऑफ इंडिया' मधील कोरोना आरोग्य केंद्रामध्ये ऑक्सिजनवर असलेल्या कोरोना रुग्णांवर उपचारांसोबत होणारे आकस्मिक मृत्यू टाळता यावे यासाठी ब्लड थिनर्स इंजेक्शनचा वापर केला जात आहे. 50 वर्षांवरील सर्व प्रकारच्या रुग्णांवर हा प्रयोग केला जात आहे. आतापर्यंत कोरोनाच्या आकस्मिक मृत्यूचीही नोंद केली गेली आहे. पण, हे मृत्यू जरी कोरोनामुळे नोंदवले गेले असले तरी काही रुग्णांच्या रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होऊन त्यांचा आकस्मिक मृत्यू झाला. 

आधी रुग्णांमध्ये फुप्फुसाचा त्रास आणि न्युमोनिया झाल्याची लक्षणे दिसून येत होती. त्यातून, रुग्णांचा आकस्मिक मृत्यू होत होता. त्यानंतर, त्या रुग्णांच्या रक्तवाहिन्या (आर्टरी आणि वेन्स) मध्ये छोट्या गुठळ्या झाल्याचं समोर आलं. काही रुग्णांना आकडी येण्याची घटना घडली आहे. कोरोनाच्या संसर्गाचा सर्वात जास्त परिणाम हा रक्तवाहिन्यांच्या आतील भागात इजा होते. त्यातून, रक्ताची गाठ तयार होते. ही गाठ शरीराच्या कोणत्याही भागात म्हणजेच मेंदू, ह्रदयात जाऊन बसली की रुग्णाचा आकस्मिक मृत्यू होतो. हेच टाळता यावे म्हणून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून 50 ते 55 वर्षांवरील सर्व रुग्णांवर ब्लड थिनर्स इंजेक्शनचा वापर केला जात आहे. तसंच, डायबिटीस, हायपरटेंशन असलेल्या कितीही वयोगटातील रुग्णांवर या इंजेक्शनचा वापर केला जातो. 

फिजिओथेरेपीचाही प्रयोग - 

सुरुवातीला 1 एमबीबीएस डॉक्टर्स आणि इतर सहा डाॅक्टरांनी मिळून या कोविड सेंटरमध्ये उपचार केले जात होते. मात्र, आता ही संख्या वाढली असून अनेक प्रयोग केले जात आहेत. कोरोना रुग्णांच्या आहारासाठीही विशेष लक्ष दिले जात आहे. यासाठी खास आहारतज्ज्ञ देखील नेमले गेले आहेत. मानसिक संतुलन चांगलं राहावं म्हणून मनोरंजनात्मक आणि प्रशिक्षणाचे कार्यक्रम राबवले जात आहेत. सकाळी आणि संध्याकाळी 1 तास योगा सेशन्सही घेतले जात आहेत. कोरोनाबाधित रुग्णांमध्ये प्रामुख्याने फुप्फुसामध्ये संसर्ग होत असल्याने श्वास घ्यायला त्रास होतो. त्यामुळे, फुप्फुसांच्या स्नायूची ताकद वाढावी म्हणून फिजिओथेरेपीचाही प्रयोग कोरोना रुग्णांवर केला जात आहे. 

आपण कोरोना रुग्णांवर सर्वांगीण उपचार पद्धती वापरत आहोत. त्यात, आजारांच्या लक्षणांनुसार उपचार केले जातात. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दररोज 50 वर्षांवरील कोरोना रूग्णांसाठी ब्लड थिनर्स इंजेक्शनचा वापर केला जात आहे. कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे रुग्णांच्या रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होतात. यातून आकस्मिक मृत्यू होतो. त्यामुळे, डायबिटीस, हायपरटेंशन आणि गर्भवती महिलांना ही ब्लड थिनर इंजेक्शन दिले जात आहे. कमीत कमी 5 दिवस इंजेक्शन हे दिले जाते. आतापर्यंत हजारांहून अधिक रूग्णांवर हे इंजेक्शन दिले गेले आहेत असं NSCI च्या प्रमुख डॉ. नीता वर्टी यांनी सांगितलं. 

to prevent corona mortality blood thinners are used on covid patients

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.