Mumbai : पावसाळी आजारांना रोखा; प्रभावी उपायोजना राबवा; पालिका आयुक्तांचे यंत्रणांना आवाहन

डास निर्मूलनाच्या वार्षिक मोहीमेसाठी आर्थिक तरतूद करावी; इकबाल सिंह चहल
prevent monsoon diseases Implement effective countermeasures Municipal commissioner appeal health mumbai
prevent monsoon diseases Implement effective countermeasures Municipal commissioner appeal health mumbaisakal
Updated on

मुंबई : पावसाळी आजारांना रोखण्यासाठी डासांची उत्पत्ती स्थाने नष्ट करा, डास निर्मूलनाच्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीत कोणतीही कमतरता ठेवू नका, प्रभावी उपाययोजना राबवा, विविध शासकीय-निमशासकीय यंत्रणांनी पालिकेच्या कीटकनाशक विभागाला सहकार्य करा, असे आवाहन पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी केले. प्रत्येक यंत्रणेने डास निर्मूलनाच्या वार्षिक मोहीमेसाठी आर्थिक तरतूद करावी, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

पालिकेच्या विविध शासकीय, निमशासकीय, यंत्रणांचा समावेश असलेल्या डास निर्मूलन समितीची आढावा बैठक पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या अध्यक्षतेखाली पालिका मुख्यालयात आज पार पडली. यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, सहआयुक्त रमेश पवार,

संजय कु-हाडे, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे आदी विविध प्राधिकरणांचे प्रतिनिधी उपस्थित होते. शासकीय, निमशासकीय प्राधिकरणांच्या इमारतींवरील टाक्या डास प्रतिबंधक कराव्यात तसेच अडगळीचे साहित्य निष्कासित करण्यात यावे याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

मुंबईतील आस्थापनांच्या ६७ यंत्रणांच्या परिसरात मिळून एकूण २८ हजार ८८५ पाण्याच्या टाक्या आहेत. त्यापैकी २२ हजार ८४८ पाण्याच्या टाक्यांच्या ठिकाणी डास प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली आहे. तर ६ हजार ०३७ पाण्याच्या टाक्यांच्या ठिकाणी उपाययोजना प्रलंबित आहेत.

पावसाळापूर्व कामांमध्ये विविध संस्थांच्या परिसरात पाण्याच्या टाक्या डास प्रतिबंधक करण्याची कार्यवाही ८० टक्के पूर्ण झाली आहे. विविध संस्थांच्या परिसरात पाण्याच्या टाक्या डास प्रतिबंधक करण्याची उर्वरित कामे तातडीने पूर्ण करावीत. डास उत्पत्ती होऊ नये यासाठी महानगरपालिकेकडून केल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आदेश पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले.

लेप्टोस्पायरेसिसला रोखा

लेप्टोस्पायरेसिस नियंत्रणासाठी मार्च २०२३ पासून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत पाणी साचत असलेल्या ठिकाणांची यादी प्रशासनाकडून तयार करण्यात आली आहे. मूषकांच्या संख्येत घट करण्याच्या दृष्टीने औषधी गोळ्यांचा वापर केला जातो आहे. उंदीर पकडण्यासाठी पुरेशा सापळ्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळेत उंदीर पकडण्यासाठीचे काम १७ विभागात स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून राबविले जात असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.