खासगी बस चालकांकडून लूट, चेंबूर ते श्रीवर्धन तिकिट ७०० रुपये

प्रवाशांकडून दुप्पट भाड्याची वसुली
private bus parking
private bus parking
Updated on

मुंबई: कोरोनाच्या काळात एकीकडे आधीच सर्वसामान्य नागरिक आर्थिक अडचणीत (financial trouble) असतांना खासगी बस प्रवासी वाहतुकदारांकडून (private bus service) प्रवाशांची सर्रास आर्थिक लूट केली जात आहे. मुंबईहून कोकणात किंवा राज्यात कुठेही प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून दुप्पट भाडे वसुल केले जात आहे. त्यामुळे ब्रेक द चेन अंतर्गत राज्य सरकारने खासगी बस वाहतुकदारांवर लावण्यात आलेल्या नियांनाचा सर्रास भंग होत आहे. (Private bus service ticket rates are double than normal)

सध्या एसटीच्या फेऱ्या फार नसल्याने सर्वसामान्यांना खासगी बस शिवाय पर्याय नाही. त्यामुळे श्रीवर्धन जाणाऱ्या अरुणा कुरवटकर यांनी चेंबूर ते श्रीवर्धन प्रवासासाठी खासगी बसचा पर्याय शोधला होता. दरम्यान खासगी आणि एसटी महामंडळाच्या बसचे श्रीवर्धन जाण्यासाठीचा भाडे सुमारे 350 रुपये असतांना खासगी बस वाहतुकदारांकडून दुप्पट म्हणजेच तब्बल 700 रुपये घेतल्याचे त्यांनी सांगितले.

private bus parking
मुंबईकरांनो आज लसीकरणाला उतरण्याआधी 'ही' बातमी वाचा

शिवाय याच खासगी बस मध्ये सोशल डिस्टनसिंगच्या नियमांची पायमल्ली करून, प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे. रेल्वे प्रवासात सततचे तेच कपडे किंवा पडदे,चादरी वापरल्याने कोरोनाचा फैलाव प्रवासात अधिक होऊ शकतो असे तज्ञ डॉक्टरांनी सांगितल्याने रेल्वे प्रशासनाने रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमध्ये चादरी देणे बंद केले आहे. तर पडदे सुद्धा काढले आहे.मात्र, या नियमांचे राज्यातील खासगी बस वाहतुकदारांकडून गेल्या वर्षांपासून अद्याप करण्यात आले नसून, पडदे लावूनच खासगी बस मधील गर्दी लपवण्याचा प्रयत्न खासगी बस काहतुकदारांकडून सुरू असल्याचे दिसून येत आहे.

private bus parking
बारावी परीक्षा रद्द करण्यासाठी वर्षा गायकवाडांची सावध भूमिका

तक्रार करण्याच्या माध्यमांचा अभाव

राज्य परिवहन विभागामध्ये सर्वसामान्य नागरिकांची प्रवासी भाडे किंवा वाहतुकीसंदर्भात काही तक्रारी असल्यास त्यानी आरटीओ कार्यालयांमध्ये जाऊन तक्रार करण्याचे आवाहन राज्य परिवहन विभागाकडून केल्या जाते. मात्र, ज्याप्रमाणे रेल्वे, ओला, उबेर, विमानसेवा त्यांनतर आता एसटी महामंडळाची बस सेवा सुदधा प्रवाशांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी आणि सामान्य प्रवाशांशी जुडण्यासाठी ट्विटरसह, सर्वच प्रकारचे समाजमाध्यम सुरू केले,त्याप्रमाणे परिवहन विभागाने सुद्धा सर्वसामान्यांनाच्या तक्रारीसाठी एक माध्यम उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

"ब्रेक द चेन अंतर्गत राज्य शासनाने लावलेले निकष खासगी बस वाहतुकदारांनाही लागू आहे. मात्र त्याचे पालन होत नसल्यास किंवा दुप्पट भाडे वसुली करत असल्यास प्रवाशांनी त्यासंबंधित पुराव्यासह राज्यभरातील कोणत्याही आरटीओ अधिकारी कार्यालयात प्रवाशांना तक्रार करता येते. अशा तक्रारीची दखल घेतल्या जाईल."

- अविनाश ढाकणे, आयुक्त, परिवहन विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.