मुंबई, ता. 6: "मिशन बिगीन अगेन"अंतर्गत टप्याटप्याने निर्बंध उठवले जात आहेत. त्यास अनुसरून राज्यात खाजगी बसेसना 100 टक्के प्रवासी वाहतुकीस परवानगी देण्यात आली आहे. याबाबतचे परिपत्रक गृहविभागाने प्रसिद्ध केले आहे.
कोरोना साथीचा संसर्ग झाल्यावर राज्यात खाजगी वाहतुकीवर निर्बंध घालण्यत आले होते. मात्र त्यानंतर हे निर्बंध शिथील करत प्रवासास परवानगी देण्यात आली होती. खाजगी वाहतूक करताना यापूर्वी 30 टक्के प्रवासी क्षमतेने परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर शुक्रवारी 100 टक्के क्षमतेने प्रवासी वाहतुकीस परवानगी देण्यात आली आहे. यामधे सर्व प्रकारच्या, खाजगी, कंत्राटी वाहनांचा समावेश आहे. अशा प्रकारे परवानगी देताना नियमांचे पालन करावे लागणार आहे. खबरदारी म्हणून काही उपाययोजना करण्यात येणार आहेत.
परिवहन विमगाने वेळोवेळी जाहीर केलेल्या सुचनांचे पालन करावे लागणार आहे.
महत्त्वाची बातमी : राज्यपालांना पाठवलेल्या यादीत कोणत्या उमेदवारांची नावे?
एका फेरीनंतर वाहनाचे निर्जंतुकिकरण करावे लागणार आहे. बसचे आरक्षण, नियंत्रण कक्ष, तेथील कर्मचारी, कार्यालय हे निर्जंतुकिकरण करणे आवश्यक आहे. तसेच तेथील कर्मचारी यांनी मास्क, सँनिटायझर आदींचा वापर करणे आवश्यक आहे. प्रवासादरम्यान नाष्टा, जेवण करतेवेळी तेथील ठिकाण, उपहारगृहे निर्जंतुकिकरण केलेली असावीत. याची खबरदारी वाहन चालकाने घेणे आवश्यक आहे. जे प्रवासी मास्क वापरणार नाहीत त्यांना प्रवास करता येणार नाही.
Private buses allowed 100 percent passenger transport by state government
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.