मुंबईत १८ वर्षापुढील लसीकरणात एक मोठं चॅलेंज

18 वर्ष आणि अधिक वयोगटातील नागरिकांचे लसीकरण 1 मेपासून सुरू होत आहे.
Mumbai corona vaccination
Mumbai corona vaccinationGoogle
Updated on

मुंबई: कोविड प्रतिबंध लसीकरण मोहिमेत पुढचा टप्पा म्हणून 18 वर्ष आणि अधिक वयोगटातील नागरिकांचे लसीकरण 1 मेपासून सुरू होत आहे. मुंबईत या वयोगटातील नागरिकांची संख्या सुमारे 90 लाख इतकी आहे. या पार्श्वभूमीवर, लसीकरणासाठी पुरेशी शीतसाखळी, जागा आणि मनुष्यबळ आदी निकषांची पूर्तता करीत असलेल्या खासगी वैद्यकीय केंद्रांनी लसीकरण केंद्र नोंदणीसाठी मुंबई महानगरपालिकेकडे अर्ज करावेत, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य खात्याने केले आहे.

16 जानेवारी 2021 पासून कोविड लसीकरण सुरू झाले. त्या अंतर्गत आरोग्य कर्मचारी, आघाडीवर काम करणारे इतर कर्मचारी आणि 45 वर्ष आणि त्यापेक्षा अधिक वयाचे नागरिक यांचे टप्याटप्प्याने लसीकरण करण्यात आले. या साखळीतील पुढचा तसेच निर्णायक टप्पा आता 1 मे रोजीपासून सुरू होणार आहे. या टप्प्याअंतर्गत 18 वर्ष आणि त्यापेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

Mumbai corona vaccination
लसीकरणासाठी मुंबईकरांची गर्दी, फक्त एका दिवसांचा लसीचा साठा शिल्लक

या वयोगटातील नागरिकांचे मुंबईतील प्रमाण 90 लाखांच्या आसपास आहे. त्यांचे लसीकरण करणे आव्हानात्मक असेल. या अनुषंगाने खासगी लसीकरण केंद्राचा सदर टप्प्यात अत्यंत मोलाचा सहभाग असणार आहे. यास्तव खासगी लसीकरण केंद्रात खालील नमूद केलेल्या चार अर्हता असल्यास अशा खासगी लसीकरण केंद्रांनी आपले अर्ज नोंदणीसाठी आपल्या विभागातील वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयात देणे आवश्यक आहे. त्यानंतर सदर खासगी लसीकरण केंद्राची नोंदणी कोविन पोर्टलवर करणे सुलभ होईल.

अशी तयारी करावी लागणार

प्रत्येक लसीकरण केंद्रात लस साठवणुकीसाठी पुरेशी शीतसाखळी उपकरणे असणे आवश्यक आहे.

लसीकरण केंद्रात लाभार्थ्यांसाठी पुरेशी जागा असणे आवश्यक आहे.

लसीकरणासाठी आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ आवश्यक आहे.

लसीकरणामुळे प्रतिकूल घटना घडल्यास त्यावर योग्य उपचारांची व्यवस्था असणे आवश्यक आहे.

---------------------

(संपादन- पूजा विचारे)

private centers should apply corporation for vaccination appeal of bmc

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()