खासगी डॉक्टर्सना देखील मिळणार 'हे' संरक्षण, आता तरी खासगी डॉक्टर्स सेवा देणार का ?

खासगी डॉक्टर्सना देखील मिळणार 'हे' संरक्षण, आता तरी खासगी डॉक्टर्स सेवा देणार का ?
Updated on

मुंबई : कोविड 19 व्यतिरिक्त अन्य आजारावरील उपचारांसाठी क्लिनिक सुरू करणे आवश्यक असल्याने त्यांना पीपीई किट देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. विशेषत: येणारा पावसाळ्यात सर्दी, ताप, खोकल्याची साथ येण्याची शक्यता असल्याने खासगी डॉक्टर आणि दवाखान्यांंची आवश्यकता भासणार आहे. या काळात सेवा देणाऱ्या खासगी डॉक्टरांना सुरक्षा उपकरणे पुरवण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालिका प्रशासनास दिले आहेत.

कोविड 19 विषाणू प्रादर्भावाबाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. कोविड 19 संदर्भात जनमानसात असलेली भीती दूर होणे आवश्यक आहे. ताप, कोरडा खोकला, अशक्तपणा, अर्धशिशी, नाक चोंदलेले असणे अशा स्वरुपाची लक्षणे दिसत असल्यास लगेच चाचणी करणे गरजेचे आहे. पण अशी चाचणी डॉक्टरांच्या लेखी सल्ल्याशिवाय करता येत नाही आणि अनेक डॉक्टरांना त्यांच्या स्वत:च्या सुरक्षेसाठी खबरदारी घेतल्याशिवाय रोग्यांची तपासणी करणे योग्य वाटत नाही. त्यांची यासंदर्भातील काळजी दूर करण्यासाठी आता महापालिकेच्या वॉर्ड ऑफिसरमार्फत PPE कीट पुरवण्यात येणार आहेत. 

पावसाळ्यात विविध प्रकारचे आजार वाढण्याची शक्यता असते. या आजारांची आणि कोविड 19ची लक्षणे सारखी असल्याने जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. महापालिकांची आणि  शासनाची रुग्णालये ही कोविड 19 साठी रुग्णालये म्हणून राखून ठेवण्यात आलेली असल्याने पावसाळ्यातील आजारासंदर्भात खाजगी रुग्णालयांची भूमिका जास्त महत्त्वाची असणार आहे. या रुग्णालयांच्या कर्मचारी वर्गाकरिता सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू असणे गरजेचे आहे. त्यांच्यासाठी वाहतूक व्यवस्था देखील करण्यात येणार आहे.

मुंबईत कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मुंबईतील रुग्णसंख्या 36 हजाराच्यावर पोहोचली आहे तर मृतांचा आकडा ही 1173 वर गेला आहे. पावसाळ्यात हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खासगी डॉक्टरांची आवश्यकता मोठ्या प्रमाणावर भासणार आहे. मात्र या डॉक्टरांना सुरक्षा पुरवणे देखील महत्वाचे आहे. मुंबईत 25 हजाराहून अधिक खासगी डॉक्टर आहेत. त्यातील जे डॉक्टर आपले दवाखाने सुरू करतील त्यांना पालिकेकडून पीपीई किट आणि मास्क चा पुरवठा करण्यास सांगण्यात आले आहे.

जगात आणि देशात अन्यत्र कोविड 19 मुळे मरण पावलेल्या रुग्णांचे प्रमाण 5 ते 7 टक्के असताना मुंबईतील मृत्यू दर 3.2 टक्के आणण्यात यश मिळाले आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी पावसाळ्यात पसरणारे साथीचे आजार रोखावे लागणार आहेत. त्यामुळे खासगी डॉक्टरांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले असून कोविड विषाणू चाचणीसाठी राज्यात नव्याने 26 लॅब येत्या काही दिवसात कार्यान्वित करण्यात येणार आहेत. 

private doctors will get protection of PPE kit in mumbai read full news

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.