मुंबई : वाशी, खारघर, पनवेल आणि मुंबईहून पुण्यासाठी खासगी वाहनांमधून सर्रास शेअरिंग प्रवासी वाहतूक केली जात आहे. याकडे प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय आणि वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष असल्याने मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (Mumbai-Pune Expressway) अपघातांसाठी कारण ठरत आहे. रविवारी दुपारी 2 वाजताच्या दरम्यान माडप बोगद्याच्या दरम्यान एलपीजी (LPG) वाहून नेणाऱ्या टँकरला खासगी वाहनांतून शेअरिंग प्रवासी वाहून नेणाऱ्या वाहनाने धडक दिली ज्यामध्ये चालकासह चार प्रवासी गंभीर जखमी (Seriously injured) आहे.
सध्या एसटीची अंशतः प्रवासी वाहतूक सुरू आहे. संपामुळे राज्य सरकारने खासगी वाहनाला स्टेट कॅरेजचा दर्जा दिला आहे. मात्र, त्यामध्ये ज्या वाहनांमधून प्रवासी वाहतूक केली जाते त्याला तपासण्याचे काम करण्यात आले नाही. त्यामुळे एसटीच्या संपापूर्वीपासूनच मुंबई-पुणे ते पुणे-मुंबई मार्गावर सर्रास खासगी वाहनांमधून प्रवाशांची वाहतूक केली जात असून, वेळेची बचत करण्यासाठी वाहन चालक बेदरकारपणे वाहन चालवंतांना सुद्धा आढळून आले आहे.
मात्र, यावर कारवाई होत नसल्याने मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघातांची संख्या वाढली आहे. रविवारी झालेल्या या अपघातांमध्ये खासगी वाहनांतील प्रवासी शेअरिंगने पुणे जात असतांना ही घटना घडली, टँकरला धोरदार धडक दिल्याने खासगी वाहन टँकरच्या आतमध्ये घुसले होते. मात्र, नशीब बलवत्तर म्हणून चालकासह सगळे वाचले आहे. या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, आय आर बी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, लोकमान्य हॉस्पिटलची यंत्रणा, डेल्टा फोर्सचे जवान, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य आणि खालापूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी तेथे दाखल झाले. अपघातग्रस्तांना उपचारासाठी तातडीने एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे दाखल करण्यात आले असल्याचे मृत्युंजय दूत गुरुनाथ साठेलकर यांनी सांगितले.
एकाच दिवसात द्रुतगती महामार्गावर तीन अपघात
नवीन वर्षाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी एकाच दिवसात तीन अपघात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर झाले. सकाळी 11.40 वाजताच्या दरम्यान कोंबड्या वाहून नेणारा आयसर खोपोली एक्झिट दरम्यान पलटी झाला, या घटनेत चालक आणि त्याचा सहकारी किरकोळ जखमी झाले तर दुपारी 2 वाजताच्या दरम्यान एलपीजी वाहून देणाऱ्या टँकरला खासगी वाहनांतून प्रवासी वाहून नेणाऱ्या वाहनाने माडप बोगद्याजवळ जोरदार धडक दिली ज्यामध्ये चालकासह चार प्रवासी गंभीर जखमी झाले. तर 4 वाजताच्या दरम्यान पुणे मुंबई लेनवर आडोशी बोगद्यात वाहतूक संथ गतीने जात असताना इनोव्हा वाहनाने अचानक ब्रेक लावल्याने मागून येणाऱ्या अर्टिका वाहनाने इनोव्हाला धडक दिली दोन्ही वाहनांतील नागरिक सुरक्षित आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.