मल्टी-मोडल कॉरिडॉरचा खर्च चौपटीने वाढला; 'यामुळे' भूसंपादनालाच लागणार २१ हजार कोटी

मल्टी-मोडल कॉरिडॉरचा खर्च चौपटीने वाढला; 'यामुळे' भूसंपादनालाच लागणार २१ हजार कोटी
Updated on

मुंबई - गेल्या दशकभरापासून विचाराधीन असलेल्या अलिबाग ते विरार या १२७ किलोमीटर लांबीच्या प्रस्तावित मल्टी-मोडल कॉरिडॉरचा भूसंपादन खर्च २०२२ मध्ये २१ हजार कोटी रुपयांवर पोहोचला आहे. जो २०१२ मध्ये २,२१५ कोटी रुपये होता. या प्रकल्पाचा एकूण खर्चही २०१२ मधील १२,५५४ कोटी रुपयांवरून २०२२ मध्ये ५५,५६४ कोटी रुपयांवर अर्थात चौपट वाढला आहे.

मल्टी-मोडल कॉरिडॉरचा खर्च चौपटीने वाढला; 'यामुळे' भूसंपादनालाच लागणार २१ हजार कोटी
पुणे-सातारा मार्गावरील भीषण अपघातात मोडक महाराजांचं निधन; अनुयायांवर शोककळा

प्रस्तावित मल्टी-मोडल कॉरिडॉर दोन टप्प्यात उभारण्यात येणार आहे. ज्यामध्ये नवघर ते बालावलीला जोडणारा 98 किमी लांबीचा मार्ग अलाइनमेंट 1 आणि 29 किमी लांबीच्या अलाइनमेंट 2 अंतर्गत बलावली ते अलिबागला जोडणारा असेल. प्रस्तावित कॉरिडॉरसाठी सुमारे १,३४७.२२ हेक्टर भूसंपादनाची आवश्यकता आहे, त्यापैकी काही भाग जंगलांचा असून मुख्य जमीन खासगी मालकीची आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) वतीने सांगण्यात आलं की, या प्रकल्पाचा भूसंपादन खर्च २१,००० कोटी रुपये आहे. याबाबत इंडियन एक्स्प्रेसने वृत्त दिलं आहे.

मल्टी-मोडल कॉरिडॉरचा खर्च चौपटीने वाढला; 'यामुळे' भूसंपादनालाच लागणार २१ हजार कोटी
धक्कादायक निकाल; भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी 'गुजरात'ला मिळवून दिलं यश, पण मुलीचं पॅनल झालं पराभूत

'मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आणि मेट्रो कॉरिडॉरसह मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) जमिनीच्या वाढत्या किंमतींमुळे भूसंपादनाच्या खर्चात मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. या व्यतिरिक्त अलिकडच्या काळात नवीन भूसंपादन कायदा आणि इतर सरकारी निर्णयांमुळेही खर्चात वाढ झाली," असेही अधिकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

दरम्यान रायगड, ठाणे आणि पालघर या तीन जिल्ह्यांत भूसंपादन करण्यात येणार असून त्यापैकी पालघरमध्ये ६१.२९ हेक्टर, ठाण्यात ५२०.९२ हेक्टर, तर रायगडमध्ये सुमारे ७६५.०१ हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.