- 'The Protein Week (द प्रोटीन वीक) 2021'च्या अभ्यासातून समोर आली माहिती
मुंबई: शहरातील तीनपैकी एका प्रौढ व्यक्तीचा जीवन दर्जा निकृष्ट असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. 24 ते 30 जुलै दरम्यान सुरु असलेल्या 'द प्रोटीन वीक 2021'च्या अभ्यासानुसार मुंबईतील तीनपैकी एक प्रौढ व्यक्तीची क्वाॅलिटी ऑफ लाइफ (Quality of Life) निकृष्ट दर्जाची आहे. यामुळे प्रौढांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. या अभ्यासानुसार, चांगल्या जीवनशैलीसाठी पोषणात्मक पदार्थ मिळणे गरजेचे असल्याचेही स्पष्ट झाले आहे. (Protein Week 2021 Survey Study suggests 33 percent of Mumbaikar adults have poor life quality)
हे सर्वेक्षण आयपीएसओएस (IPSOS) या जागतिक संशोधन संस्थेने देशातील आठ शहरांत केले. यात 27, 62l प्रौढांच्या नमून्याचा अभ्यास करण्यात आला. सर्वेक्षणादरम्यान आहार मूल्यांकनावरून केवळ 9% लोक प्रोटिनच्या दैनिक गरजा पूर्ण करत असल्याचे लक्षात आले. डॅनोन इंडियाने कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री च्या सहकार्याने प्रोटिन सप्ताहाच्या निमित्ताने दिल्ली, मुंबई, लखनऊ, चेन्नई, इंदौर, हैदराबाद, कोलकत्ता आणि पटना या शहरांत हे सर्वेक्षण केले.
शारीरिक व मानसिक आरोग्य, सामाजिक संबंध आणि पर्यावरण यात सरासरी टक्केवारीच्या आधारे चांगले किंवा निकृष्ट आरोग्य असे वर्गीकरण करण्यात आले. त्यातून हे परिणाम समोर आले होते. यात दोनपैकी एक प्रौढाच्या जीवनाचा दर्जा निकृष्ट असल्याचे समोर आले. त्यातही महिलांचा जीवन दर्जा पुरूषांपेक्षा अधिक निकृष्ट असल्याचेही या अहवालातुन स्पष्ट होते.
या अहवालानुसार गुणांक - कोलकत्ता -65%, चेन्नई -49.8%, दिल्ली- 48.5%, पटना - 46.2%, हैदराबाद-44.4%, लखनऊ-40% आणि इंदौर 39.2% अशी नोद करण्यात आली. विशेष म्हणजे इतर शहरांच्या तुलनेत मुंबईत जीवनाचा चांगला दर्जा असलेल्या प्रौढांची सर्वात जास्त (68%) नोंद झाली. यात 99% प्रतिसादकर्त्यांनी शारीरिक आरोग्यासाठी पोषण महत्वाची भूमिका बजावत असल्याचे कबूल केले.
याविषयी माहिती देताना डॅनोन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक हिमांशू बक्षी यांनी सांगितले की, प्रोटिनबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि भारतीय प्रौढांच्या जीवनदर्जाचे मूल्यांकन करण्यासाठी हे सर्वेक्षण आयोजित केले होते. सीआयआयच्या पोषणावरील राष्ट्रीय समितीच्या अध्यक्षा विनिता बळी यांनी सांगितले की, सर्वेक्षणाच्या परिणामांवरून पुन्हा एकदा पोषणामधील फरक लक्षात आला आहे. हा फरक पोषक अन्नपदार्थ परवडणाऱ्या दरात उपलब्ध करुन दिले तर भरुन निघू शकतो.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.