विद्यार्थ्याला प्रवेश नाकारल्याने श्रमजीवी संघटनेचे ठिया आंदोलन 

pune.jpg
pune.jpg
Updated on

वज्रेश्वरी : गणेशपुरी शिवाजी चौक येथे असलेल्या वज्रेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यु इंग्लिश स्कुल अँड कॉलेज मध्ये आज श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आदिवासी विद्यार्थ्याला प्रवेश मिळवून दिला. निखिल हरके असे या विद्यार्थ्याचे नाव असून त्याला अकरावी विज्ञान शाखेत तो नापास असल्या कारणाने प्रवेश नाकारला गेला होता. तसेच तो आदिवासी असल्याने प्रवेश दिला जात नाही या मुद्यावर संघटना आक्रमक झाली होती.

निखिल हरके या आदिवासी विद्यार्थ्याला 10 वी मध्ये 73 टक्के गुण होते, तो वाडा येथे स्वामी विवेकानंद महाविद्यालयात शिकत होता आजारपणामुळे तो 11वीला अनुत्तीर्ण झालेला,त्यानंतर त्याने ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमध्ये त्याने अर्ज केला होता. त्यामध्ये त्याचे प्रवेश पात्र यादीत नाव आले, जेव्हा तो प्रवेश घ्यायला गेला त्यावेळेस त्याला प्रवेश नाकारण्यात आला होता.

या विद्यार्थ्यांच्या एका नातेवाईकांकडून ही बाब श्रमजीवी संघटनाचे  जिल्हा युवक प्रमुख प्रमोद पवार यांना ही गोष्ट समजली. त्यांनी संघटनेच्या आणि युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांसह वज्रेश्वरी शिवाजी चौक  कॉलेज गाठले. कोणत्या नियमाने प्रवेश नाकारला याबाबत प्रशासनाला विचारणा केली,  प्रवेश मिळत नाही तो पर्यंत येथून जाणार नाही अशी भूमिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घेऊन याच ठिकाणी ठिय्या देऊन बसले. त्यानंतर कॉलेज मध्ये म्हैस आणायची व्यवस्था करून या मुलाला प्रवेश द्या नाहीतर त्याला प्राचार्यांच्या हस्ते म्हैस चरायला पाठवा असे सांगत येथील प्रशासनाची पार तारांबळ उडवली. हा सगळा प्रकार तीन तास सुरू राहीला.

 दरम्यान, श्रमजीवीचे कार्यकर्ते आपल्या न्याय्य  मागणीवर ठाम राहिले आणि प्रवेश नाकारण्याच्या मागणीवर ठाम असलेल्या वज्रेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्रशासनाला अखेर माघार घ्यावी लागली. निखिल हरके याला अखेर प्रवेश मिळून देण्यात आला आहे
.
अगदी कमी वेळेचे नियोजन असलेल्या यशस्वी आंदोलनात श्रमजीवी युवक जिल्हा प्रमुख प्रमोद पवार, यांनी पुढाकार घेतला होता. यावेळी तालुका अध्यक्ष सुनील लोणे, दुष्यंत घायवट, फ्रांसिस लेमोस, मोहन शिंदे, भगवान देसले, आशा भोईर, युवक तालुका अध्यक्ष जयदास पाटील, काशीनाथ चिपळूणकर , वैशाली पाटील, रोहित हरके, संजय जाधव, यांसह इतर युवक व ज्येष्ठ कार्यकर्ते सहभागी झाले होते.

शाळा प्रशासनाने याबाबत, ''सदर विद्यार्थी हा स्वामी विवेकानंद कॉलेज वाडा येथे विज्ञान शाखेत अनुतीर्ण झाला होता, तसेच त्याने प्रवेश प्रकियेत दहावी पासचे प्रमाण पत्र लावले होते. त्यामुळे यादीत त्याचे नाव आले होते. मात्र टीसी तपासले असता 11 वी नापास आढळून आला. तसेच आमच्या शाळेत कुठल्याही प्रकारचा जातीयवाद होत नसून परिसरातील गाव, खेडे मधील अनुसूचित जाती व आदिवासी समाजाची 70 टक्के विद्यार्थी या विद्यालयात शिक्षण घेतात. वज्रेश्वरी न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात एकूण 1540 विद्यार्थी शिक्षण घेतात. तसेच उन्हाळी सुट्टीत आमचे शिक्षक वृंद आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणच्या प्रवाहात आणण्यासाठी पालकांची भेटी घेऊन शिक्षनात सामील करून घेतले आहेत
'' अशी भुमिका स्पष्ट केली. 
- जगन्नाथ पाटील (अध्यक्ष) व चंद्रकांत भोईर (सचिव), वज्रेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळ  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.