मुंबई- लोकलच्या गर्दीत धक्के खात प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांना स्वतंत्र डबा उपलब्ध करण्याचे काम दोन वर्षांत पूर्ण करा. तोपर्यंत मधल्या मालडब्यातून प्रवास करू देण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाला दिले. या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास सुखकर होणार आहे.
लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी मर्यादित राखीव आसने आहेत. गर्दीच्या वेळी वृद्धांची होणारी गैरसोय लक्षात घेता उच्च न्यायालयातील माजी कर्मचारी के. पी. पुरुषोत्तम नायर यांनी जनहित याचिका दाखल केली. मध्य आणि पश्चिम रेल्वेने गेल्या वर्षी ज्येष्ठांसाठी स्वतंत्र डब्याचा प्रस्ताव सादर केला होता.