pune Market yard
pune Market yardsakal

Mumbai:सोमवारी मुक मोर्चा, काळे कपडे घालुन निषेध,तर गुरूवारी मार्केट यार्ड बंद

मार्केट यार्डातील संघटनांचा निर्णय
Published on

पुणे : कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेमधील बेकायदेशिर लिंबू विक्रेत्यांवर कारवाई केल्याचा राग मनात धरून माजी प्रशासक, अधिकारी, कर्मचारी व अडत्यांच्या विरोधात दाखल झालेला ॲट्रॉसिटी आणि विनयभंगाचा गुन्हा रद्द व्हावा,

या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी (ता.१७) काळे कपडे घालुन निषेध व्यक्त करण्यात येणार आहे. तसेच मुक मोर्चा काढून सर्व संघटनांच्या वतीने मार्केट यार्ड पोलीस स्टेशनला निवदेन देण्यात येणार आहे.

याबाबतची बैठक रविवारी मार्केट यार्डातील जय शारदा गणेश मंदिरात पार पडली. यामध्ये गुरूवारी (ता.२०) बाजार बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती आडते असोसिएशनचे अध्यक्ष अनिरूद्ध (बापू) भोसले यांनी दिली.

यावेळी अडते असोसिएनशनचे अध्यक्ष बापू भोसले, ज्येष्ठ अडते गणेश घुले, अडते असोसिएशनचे माजी अध्यक्ष विलास भुजबळ, सचिव करण जाधव, उपाध्यक्ष सौरभ कुंजीर, युवराज काची, तोलणार संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे, अडते असोसिएशनचे संचालक रोहन जाधव, आप्पा कोरपे आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.

pune Market yard
Mumbai Pune एक्सप्रेस वे वर पोलिस अधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू, ड्युटीवर जाताना बसने दिली धडक

बाजार समिती आवारात कोणताही परवाना न घेता बेकायदेशिररित्या अतिक्रमण करून, लिंबाची विक्री अनेकांकडून सुरू होती. लिंबू विक्रीमुळे बाजार आवारात वाहतुक कोंडी होत होती. याच्या विरोधात अतिक्रमण निर्मुलन मोहिम बाजार समिती प्रशासनाने पोलीसांच्या सहकार्याने राबविली.

मात्र हि मोहिम राबविताना कोणताही गुन्हा अधिकाऱ्यांवर दाखल झाला नाही. मात्र सहा महिन्यांनंतर दाखल झालेला गुन्हा हा अन्यायकारक असल्याची भुमिका बाजार समिती अधिकारी, कर्मचारी, बाजार घटकांनी मांडत. दाखल झालेले गुन्हे रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांकडे केली आहे.

गुरूवारी (ता.२०) बाजार बंद ठेवण्यात येणार असल्याचे आडते असोसिएशनच्या रविवारी (ता.१६) झालेल्या बैठकीत ठरले आहे. गुन्हा रद्द व्हावा या मागणीसाठी सोमवारी (ता.१७) काळे कपडे घालुन निषेध करण्यात येणार आहे. मुक मोर्चा काढून सर्व संघटनांच्या वतीने पोलीस स्टेशनला निवदेन देण्यात येणार आहे.

-अनिरूद्ध (बापू) भोसले, अध्यक्ष, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()