मुंबई : पुण्यातील 'हिट अँड रन' प्रकरणी पालकमंत्री अजित पवार यांनी पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. याचं स्पष्टीकरण देताना ते खोटं बोलत आहेत, त्यामुळं अजित पवारांचा फोन जप्त करुन त्यांची नार्को टेस्ट करायला हवी होती, अशी मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान, पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. (pune porsche accident Anjali Damania demanded seize Ajit Pawar phone and do narco test)
दमानिया म्हणाल्या, "एखादा पालकमंत्री इतका प्रोअॅक्टिव्ह असतो की तो प्रत्येक ठिकाणची चौकशी करतो, पाहणी करतो. मी सकाळीच उठून काम करतो असं अजित पवार सांगत असतात पण हाच माणूस जेव्हा पुण्यात एवढी मोठी घटना घडते त्यावर काल कसा बोलत होता? जे अजित पवार नेहमी भडकून बोलत असतात ते काल पत्रकार परिषदेत गांगरल्यासारखे वागत होते"
पहिला प्रश्न हा की त्यांनी पोलीस आयुक्तांना फोन केला होता की नाही हे त्यांनी स्पष्ट करावं. एकदा पोलीस आयुक्तांना देखील प्रश्न विचारा की अजित पवारांकडून तुम्हाला थेट फोन आला होता की नाही. तसेच आमदार सुनील टिंगरे पोलीस स्टेशनमध्ये का आले होते? कोणाच्या सांगण्यावरुन आले होते? हे एकदा टिंगरेंना देखील विचारलं पाहिजे. सर्व गोष्टींवर स्पष्टीकरण मिळायला हवं, काल त्यांनी जे जे सांगितलं ते धादांत खोटं होतं. अजित पवारांनी निश्चितच आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं अजित पवारांचा फोन खरंतर जप्त झाला पाहिजे खरंतर त्यांची नार्को टेस्टही व्हायला हवी होती, असं अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे.
दमानियांचे आरोप अमितेश कुमारांनी फेटाळले
पुण्याचे पोलीस आयुक्त आमितेश कुमार यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांचे आरोप खोटे आणि बिनबुडाचे आहेत असं त्यांनी म्हटलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.