पुण्याच्या कल्याणीनगर इथं घडलेल्या पोर्शे कार अपघातातील मृत तरुण-तरुणीच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात आत्तापर्यंत कठोर कारवाई करण्यात आल्याचं या कुटुंबांना सांगितलं तसंच हे प्रकरण फास्टट्रॅकवर चालवण्याचं आश्वासनं दिलं. (Pune Porsche Accident case will be in fast track court compensation of rs 20 lakhs CM Eknath Shinde gave assurance to victim families)
बिल्डरच्या अल्पवयीन मुलानं आलिशान पोर्शे कार बेदरकपणे चालवून दुचाकीवरील तरुण-तरुणीचा जीव घेतला होता. या प्रकरणामुळं पुणे शहरच नव्हे तर देश हादरला. तसंच या प्रकरणात घटना घडल्यापासून तपासात हस्तक्षेपाचे अनेक प्रयत्न झाल्याचं उघड झालं आहे. त्याचबरोबर अनेक गैरप्रकारही या प्रकरणात घडून आले. यामध्ये आरोपीचे ब्लड रिपोर्ट बदलल्याप्रकरणी ससून रुग्णालयाच्या डॉक्टरांवर कारवाई झाली. अल्पवयीन आरोपीच्या वडिलांवर, आजोबांवर तसंच आईवर देखील कारवाई झाली.
तसंच काही पोलीस कर्मचारी देखील या प्रकरणात कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबित झाले आहेत. दरम्यान, आरोपींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी काही कायदेशीर पावलं उचलावी लागल्यास राज्य सरकार तेही करणार, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीडित कुटुंबियांना भेटीवेळी दिलं.
तसंच अपवादात्मक परीस्थिती लक्षात घेता मुख्यमंत्र्यांकडून दोन्ही पीडित कुटुंबियांना प्रत्येकी १० लाखाची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. तसंच ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे आदेशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहेत, असं साम टीव्हीनं आपल्या वृत्तात म्हटलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.