कोंबडी बाजारात घुसला भलामोठा अजगर आणि घडलं असं की...

कोंबडी बाजारात घुसला भलामोठा अजगर आणि घडलं असं की...
Updated on

पाली -  पाली शहरातील कोंबड्यांच्या बाजारात आज मोठी धावपळ पहायला मिळाली. श्रावण महिण्याच्या दिवसांमध्ये बाजारात कोंबड्यांच्या मांसाला कमी मागणी असल्यामुळे ग्राहकांची तेवढी वरदळ नसते. परंतु या बाजारात आज वेगळ्याच कारणामुळे धावपळ पहायला मिळाली.

पाली येथील या कोंबडी बाजारात गुरुवारी (ता.6) रात्री भलामोठा अजगर शिरला होता. अजगर शिरल्याचे कोणाच्या लक्षात आले नाही. त्यामुळे अजगराने या बाजारातील काही कोंबड्यांवर मनसोक्त ताव मारला. ही बाब स्थानिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी नजीकच्या सर्पमित्रांना तत्काळ कळवले. सर्पमित्र तेथे पोहचल्या नंतर त्यांनी या भल्यामोठ्या अजगराला शिथाफीने पकडले. या सर्पमित्रांनी अजगर पकडल्याची कल्पना वन विभागालाही दिली, तसेच रात्री १० च्या सुमारास त्यांनी वनविभागाच्या मदतीने अजगराला  जंगलात सुखरूप सोडले. 

या अजगराला सर्पमित्र सर्पमित्र रोशन ठोंबरे व अमित निंबाळकर यांनी पकडले. तसेच वनविभागाचे कर्मचारी दिपक तळले यांनी अजगराची तपासणी केली. रात्री सर्वांनी मिळून दापोडे येथील जंगलात अजगराला सुखरूप सोडले.

--------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.