Rahul Gandhi Mumbai: महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेत्याने काँग्रेस सोडली अन् माझ्या आईकडे रडले...राहुल गांधींनी सांगितला किस्सा!

Rahul Gandhi Mumbai: काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप आज मुंबईत झाला. यावेळी इंडिया आघाडीचे देशातील मोठे नेते उपस्थित होते.
Rahul Gandhi Mumbai
Rahul Gandhi Mumbai esakal
Updated on

Rahul Gandhi Mumbai:  काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप आज मुंबईत झाला. यावेळी इंडिया आघाडीचे देशातील मोठे नेते उपस्थित होते. शरद पवार, उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला देखील उपस्थित होते. यावेळी राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

"आम्ही एका शक्तीशी लढत आहोत. प्रश्न असा आहे की ती शक्ती काय आहे. आत्मा? राजाचा आत्मा EVM मध्ये आहे. हे सत्य आहे. राजाचा आत्मा EVM मध्ये आणि देशातील प्रत्येक संस्था, ED, CBI आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये आहे. महाराष्ट्रातील एका ज्येष्ठ नेत्याने काँग्रेस सोडली आणि माझ्या आईकडे रडले आणि म्हणाले, 'सोनियाजी, मला लाज वाटते की या शक्तीशी लढण्याची ताकद माझ्यात नाही. मला तुरुंगात जायचे नाही. हजारो लोकांना अशा धमक्या दिल्या आहेत", असे राहुल गांधी म्हणाले.

गेल्या वर्षी आम्ही कन्याकुमारी ते काश्मीर असा प्रवास केला. देशाची संपर्क यंत्रणा, प्रसारमाध्यमे किंवा सोशल मीडिया देशाच्या हातात नाही. बेरोजगारी, हिंसाचार, द्वेष, महागाई, शेतकरी, अग्निवीर असे सार्वजनिक प्रश्न तुम्हाला मीडियामध्ये दिसणार नाहीत. देशाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आम्ही यात्रा काढली, असे राहुल गांधी म्हणाले.

चीनमध्ये एक शेन्झेन आहे. धारावी शेन्झेनशी स्पर्धा करू शकते, फक्त त्यांच्यासाठी बँकेचे दरवाजे उघडा. येथे २२ लोकांकडे भारतातील ७० कोटी लोकांएवढा पैसा आहे. भारतात आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होण्यासाठी अनेक वर्षे लागतात. लग्नासाठी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ १० दिवसांत उघडेल. ते उघडा, पण इतर राज्यातही विमानतळे सुरू करा, असा टोला राहुल गांधी यांनी भाजपला लगावला आहे.

Rahul Gandhi Mumbai
Prakash Ambedkar: "सोबत असो वा नसो, आपल्याला..."; इंडिया आघाडीच्या व्यासपीठावरुन प्रकाश आंबेडकरांचे एका दगडात २ पक्षी

देश ९० अधिकारी चालवत आहेत. मी आतून सिस्टम पाहिली आहे, म्हणूनच मोदीजी मला घाबरतात. माझ्यापासून काहीही लपून राहू शकत नाही. त्यातील तीन अधिकारी मागासलेले आहेत. ३ दलित आहेत. हे ९० लोक पॉलिसी बनवतात. हीच खरी शक्ती भारत चालवत आहे. नरेंद्र मोदी ईव्हीएमशिवाय निवडणूक जिंकू शकत नाहीत, असे राहुल गांधी म्हणाले.

तुम्ही लोक जीएसटी भरा. तेवढीच रक्कम अदानी देते. तुम्ही शर्टवर १८ टक्के GST भरता, अदानी सुद्धा तेच भरते. मग पैसा जातो कुठे? तुमचे लक्ष दुसरीकडे वळवणे हे नरेंद्र मोदीजींचे काम आहे. कधी ते म्हणतील- चीनकडे बघा, पाकिस्तानकडे बघा. इथे चिनी वस्तू विकल्या जातात तेव्हा चीनचा फायदाच होत नाही तर आपल्या उद्योगपतींनाही फायदा होतो. संपूर्ण यंत्रणा नियंत्रणात आहे.

राहुल गांधी म्हणाले, आज नरेंद्र मोदींची भ्रष्टाचाराची मक्तेदारी आहे. इलेक्टोरल बाँड्सची पद्धत सुरू झाली. इथे रस्त्यावरून खंडणी सुरू आहे, हे भाजप सरकार करत आहे. कंपनीला कंत्राट मिळते, त्यानंतर ते थेट इलेक्टोरल बाँड्स खरेदी करतात. कंपनी कोणताही नफा कमवत नसून त्यापेक्षा जास्त पैसा भाजपला देत आहे.

Rahul Gandhi Mumbai
India Alliance Sabha: संविधान बदलण्यासाठी भाजपला 400+ हवेत, छोडो 'भाजप'ची घोषणा! पवार-ठाकरेंनी शिवाजी पार्क गाजवलं

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.