Loksabha 2024: 'त्या' दोन्ही जागा काँग्रेसच्या, परत घ्या; राज्यातील नेत्यांची गांधींना हाक

सांगली, दक्षिण मध्य मुंबईमधून काँग्रेसला लढू द्या!; योग्य निर्णयाचा विश्‍वास |Let Congress fight from Sangli, South Central Mumbai!; Confidence in the right decision
Loksabha 2024: 'त्या' दोन्ही जागा काँग्रेसच्या, परत घ्या; राज्यातील नेत्यांची गांधींना हाक
Updated on

Mumbai News: ठाकरे गटाचे पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आता महाराष्ट्रातील जागा वाटपाबद्दलची चर्चा २०२९ सालीच होईल, असे सांगत लोकसभा मतदारसंघांच्या फेरविचारास ठाम नकार दिला असला तरी सांगली, दक्षिण मध्य मुंबई या दोन्ही जागा काँग्रेसच्या आहेत.(Sangli, South Central Mumbai)

Loksabha 2024: 'त्या' दोन्ही जागा काँग्रेसच्या, परत घ्या; राज्यातील नेत्यांची गांधींना हाक
Wardha Loksabha: अमर काळेंनी पंजा सोडत धरली तुतारी,वर्धा लोकसभेची मिळाली उमेदवारी; शरद पवारांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

त्या परत घ्या, अशी विनवणी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना केली आहे.(mumbai Loksabha News)

शिवसेनेच्या ठाकरे गटाचा सांगली लोकसभा मतदारसंघात कोणताही प्रभाव नाही तर मुंबईतील दक्षिण मध्य मतदारसंघात काँग्रेस शहराध्यक्ष वर्षा गायकवाड उत्तम लढत देत विजयी होऊ शकतात. (Congress city president Varsha Gaikwad)

Loksabha 2024: 'त्या' दोन्ही जागा काँग्रेसच्या, परत घ्या; राज्यातील नेत्यांची गांधींना हाक
Nagpur Loksabha: गडकरी - ठाकरे यांच्यात थेट लढत, नागपूरच्या रिंगणात २६ उमेदवार; एकाही उमेदवाराने घेतली नाही माघार

परिस्थिती अनुकूल असताना काँग्रेसने या दोन्ही जागांसाठी आग्रह धरायला हवा, असे आग्रही प्रतिपादन आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांना करण्यात आले. पक्षाच्या सर्वोच्च नेत्या सोनिया गांधी यांच्याशीही या विषयावर बोलणे झाले.(sagali congress news)

त्यांनी या संबंधात उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती नाना पटोले यांनी ‘सकाळ’ला दिली. यासंदर्भात आता हायकमांड योग्य वाटेल तो निर्णय घेतील, असेही पटोले म्हणाले. पहिल्या टप्प्यातील लढतीच्या प्रचारासाठी आज पटोले विदर्भात रवाना झाले.(thackeray vs congress)

Loksabha 2024: 'त्या' दोन्ही जागा काँग्रेसच्या, परत घ्या; राज्यातील नेत्यांची गांधींना हाक
Nagpur Loksabha: गडकरी - ठाकरे यांच्यात थेट लढत, नागपूरच्या रिंगणात २६ उमेदवार; एकाही उमेदवाराने घेतली नाही माघार

ते २ एप्रिल रोजी परतणार असून त्यानंतर मविआची बैठक होईल. मोदी सरकारच्या ध्येयधोरणांबद्दल जनता कमालीची नाराज आहे. विदर्भातील पहिल्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीतील सर्व जागा मविआ जिंकेल. ज्येष्ठ भाजप नेते नितीन गडकरीही पराभूत होतील असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला. भिवंडीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला हवी असल्याची चर्चा आहे. मात्र, काँग्रेस या जागेबाबत ठाम आहे.(maharashtra loksabha news)

‘उद्धव ठाकरे समजूतदारपणा दाखवितील’

आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी दिल्लीत आयोजित झालेल्या रॅलीनंतर तेथे हजर असलेल्या उद्धव ठाकरेंशी गांधी मातापुत्र चर्चा करतील, असा विश्वास काँग्रेसच्या प्रदेशातील नेत्यांना होता. (uddhav thackeray sonia and rahul gandhi)

उद्धव ठाकरे यांनाही पंतप्रधान मोदी यांच्या विरोधातील कौल अपेक्षित असल्याने ते समजूतदारपणा दाखवतील, अशी आशाही नेत्यांनी बोलून दाखवली. (nana patole)

Loksabha 2024: 'त्या' दोन्ही जागा काँग्रेसच्या, परत घ्या; राज्यातील नेत्यांची गांधींना हाक
Loksabha Election 2024 : ‘मनसे’बद्दल अद्याप ठरायचेय ; फडणवीस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.