मुंबई : शिवसेनेच्या शिंदे गटाचे खासदार आणि गटनेते राहुल शेवाळे यांची एसआयटी चौकशीचे आदेश विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी दिले आहेत. संसदेत आमदार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. (Rahul Shevale will be investigated by SIT Nilam Gorhe give this orders)
आदित्य ठाकरेंना दिशा सालियान प्रकरणात गंभीर आरोप केल्यानंतर शेवाळेंविरोधात एका प्रकरणात विधानपरिषदेत ठाकरे गटाकडून एसआयटी चौकशीची मागणी करण्यात आली आहे. ठाकरे गटाच्या आमदार मनिषा कायंदे यांनी एका महिलेनं केलेल्या गंभीर आरोपांप्रकरणी शेवाळेंच्या एसआयटी चौकशीची मागणी केली होती. त्यांची मागणी मान्य करत नीलम गोऱ्हे यांनी शेवाळेंच्या एसआयटी चौकशीचे आदेश दिले.
हे ही वाचा : सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...
संबंधित महिलेनं राहुल शेवाळे यांच्याविरोधात पोलीस आयुक्तांकडे देखील तक्रार केली आहे. मात्र, पोलिसांचा तिच्यावर दबाव आहे. दरम्यान, शेवाळेंविरोधात एका प्रकरणात एसआयटी चौकशी नेमण्यात आली आहे. मग दुसऱ्या प्रकरणात एसआयटी चौकशी का नाही? असा सवाल करत मी सरकारला निर्देश देते की दुसऱ्या प्रकरणातही एसआयटी चौकशी करण्यात यावी, असं विधापरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.