Raigad : वादळामुळे नौका समुद्रकिनारी ; हवामान विभागाचा ४८ तासांचा अलर्ट; गुजरातच्या बोटीही आश्रयाला

कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव अद्यापही दिसत असून किनारपट्टीवर पावसाची संततधार सुरूच आहे.
raigad
raigadsakal
Updated on

अलिबाग - अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकण किनारपट्टीवर चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली होती. खबरदारी म्हणून खोल समुद्रात गेलेल्या गुजरात राज्यातील मच्छीमार नौकांनी शनिवारी सुरक्षेच्या दृष्‍टीने रायगडमधील बंदरांचा आधार घेतला. आता हे मच्छीमार बोटीत दाणापाणी भरून पुन्हा मासेमारीसाठी जाण्याची तयारी करीत आहेत. आश्रयाला आलेल्या नौका सोमवारी सकाळपर्यंत समुद्रात जाण्याचा प्रयत्‍नात आहेत.

कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव अद्यापही दिसत असून किनारपट्टीवर पावसाची संततधार सुरूच आहे. या स्थितीतही एक दिवसाच्या विश्रांतीनंतर मच्छीमारांनी पुन्हा मासेमारीस जाण्याची तयारी केली आहे. शनिवारी सायंकाळी महाराष्ट्र-गोवा सीमा भागातील समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. त्यानंतर खबरदारी घेऊन मत्स्यव्यवसाय विभागाने समुद्रात गेलेल्या नौकांना तत्काळ बंदरात परतण्याच्या सूचना केल्या होत्या. ज्या नौकांना परतणे शक्य

नाही, त्यांनी जवळच्या बंदरात आश्रय घेण्याचा संदेश हवामान विभागाने पाठवले होता.रायगड जिल्ह्यातील पन्नासहून अधिक नौकांनी रत्नागिरी, मुंबईमधील बंदरांचा आधार घेतला, तर गुजरातमधील ७० मच्छीमार नौका करंजा, साखर-आक्षी, राजपुरी, जीवना बंदरात आल्या आहेत.या नौका खोल समुद्रात मासेमारी करीत होत्या.

raigad
Chh. Sambhaji nagar : ‘माउंट मनास्लू’वर रफिक शेख यांची यशस्वी चढाई

खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी एका फेरीला लाखो रुपये खर्च येत असल्याने आर्थिक नुकसान टाळण्यासाठी जिल्ह्यात आलेले दुसऱ्या राज्यातील मच्छीमार येथूनच पुन्हा मासेमारीसाठी रवाना होणार आहेत. त्यांनी पकडलेली मासळी येथील बंदरात लिलावात विकली असून, बर्फ, आवश्यक अन्न साहित्याची रसद घेऊन पुन्हा समुद्रात जाण्याच्या तयारीत आहेत.

raigad
Nagpur News : उपराजधानीत दोन ठिकाणी आग

बोटी भरकटण्याचा धोका

शनिवारी दुपारी पूर्व-मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून हा पट्टा गोवा-महाराष्ट्राच्या किनारपट्टीकडे सरकत असल्याने ४८ तास मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये, असे आवाहन रायगड मत्स्यव्यवसाय विभागाने केले होते. शनिवारी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत हा पट्टा दक्षिण कोकण-गोवा किनाऱ्यापासून नैऋत्य उत्तर-ईशान्य दिशेला सरकला होता. त्यानंतर रत्नागिरी, वेंगुर्ला, पणजीच्या दिशेने सरकून रविवारी रात्रीपर्यंत पणजी आणि रत्नागिरीतील कोकण किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. यादरम्यान वेगवान वाऱ्यामुळे नौका भरकटण्याची शक्‍यता असल्‍याने मच्छीमारांना ४८ तासांचा अलर्ट दिला होता.

raigad
Solapur : दहिगाव उपसा सिंचन योजनेचे खरीप आवर्तन सुरू- आमदार संजय शिंदे

मान्सून परतीच्या दरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार होत असतो. याची कल्पना मच्छीमारांना असते. तरीही कोणतीही दुर्घटना होऊ नये, यासाठी अलर्ट जारी करण्यात आला होता. रविवारी दुपारपर्यंत कोणतीही दुर्घटना घडली नसल्याचा अहवाल आहे. जिल्ह्यातून गेलेले सर्व मच्छीमार सुरक्षित आहेत. त्याचबरोबर दुसऱ्या जिल्ह्यातून किंवा राज्यातून आलेल्या मच्छीमारांना सुरक्षित आश्रय देण्यात आला आहे.

संजय पाटील, सहायक आयुक्त, मत्स्य व्यवसाय, रायगड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.