Raigad News: मत्स्‍य दुष्‍काळाने मच्छीमार चिंतेत

मुरूड समुद्रकिनारी होड्या विसावल्‍या; बाजारात भाव चढे
Raigad News
Raigad Newssakal
Updated on

Raigad News : वीकेण्डला मुरूड, काशीद समुद्रकिनारी पर्यटकांची मोठी गर्दी असते. ऐतिहासिक जंजिरा, पद्मदुर्ग किल्‍ला पाहण्यासाठी वर्षभर पर्यटक येत असल्‍याने स्‍थानिकांनाही रोजगार मिळाला आहे.

येथील खाद्यसंस्‍कृतीही अनेकांच्या पसंतीत उरतली आहे. इथली ताज्‍या मासळीवर ताव मारण्यासाठी पर्यटक आवर्जून येतात. मात्र गेल्‍या काही दिवसांपासून मासळीची आवक घडल्‍याने मच्छीमार चिंतेत आहेत. (Latest Marathi News)

मार्च महिन्यात मच्छीमारांना मुबलक मासे मिळत असल्‍याने दरही आटोक्‍यात असतात. सध्‍या खोल समुद्राज जाऊनही मासे मिळत नाही. त्‍यामुळे इंधन, वाहतूक खर्चही परवडत नसल्‍याचे मच्‍छीमार सांगतात.

सध्‍या मुरूड मासळी बाजारात बांगडे, कोळंबी, छोटी सुरमई, काटेरी मासळी उपलब्‍ध असून चढ्या भावाने विकली जात आहे. साधारण एका पापलेटच्या जोडीला एक हजार मोजावे लागत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना मासळी परवडेनाशी झाली आहे.

वातावरणातील बदल, समुद्रात वारंवार होणाऱ्या घडामोडी, वादळी वारे, अवकाळी पावसामुळे शेतीबरोबरच मासेमारीलाही फटका बसला आहे. मासेच मिळत नसल्‍याने मच्छीमार हवालदिल झाले असून आर्थिक गणित कोलमडले आहे.

समुद्रात पारंपरिक दादली पद्धतीने होणारी मासेमारी धोक्यात आली असून इंधन खर्चही निघत नसल्याने शेकडो मच्छीमारांच्या नौका गेल्‍या काही दिवसांपासून मुरूड समुद्र किनारी विसावल्या आहेत.

सरकारने मत्‍स्‍य दुष्‍काळ जाहीर करून आवश्‍यक उपाययोजना कराव्यात आणि नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी मच्छीमार संघटनांकडून करण्यात येत आहे.

आर्थिक संकट

मुरूड तालुक्यात साळाव, कोर्लई, दांडा, नांदगाव, मजगाव, कोळीवाडा, एकदरा, राजपुरी आदी गावांतील ७५० च्या घरात होड्यांची संख्या असून हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह मासेमारी व्यवसायावर अवलंबून आहे.

परंतु मासळी मिळत नसल्‍याने त्‍यांच्यावर आर्थिक संकट ओढावले आहे. मार्चअखेर असल्‍याने कर्जाचे हप्ते वसुलीसाठी बँका, पतसंस्था सरसावल्या असून १३८ व १०१ ची प्रकरणे वाढली आहेत.

Raigad News
Raigad : वीटभट्टी व्यवसायावर पावसाची अवकृपा

हवामान बदलाबरोबरच जेली माशांच्या आक्रमणामुळे जाळीचे नुकसान होत आहे. शिवाय खलाशांमध्ये त्वचेचे विकार वाढू लागले आहेत.

- दशरथ बाणकोटकर, मच्छीमार, राजपुरी

Raigad News
Raigad : वीटभट्टी व्यवसायावर पावसाची अवकृपा

खोल समुद्रात जाऊनही मासळी मिळत नाही. इंधन, मजुरीचा खर्चही निघत नाही. त्‍यामुळे मच्छीमारांची आर्थिक ओढाताण होत आहे. रायगड जिल्ह्यातील खावटी योजना राबवून राज्य सरकारने मच्छीमारांना मदतीचा हात द्यावा.

- मनोहर मकू, उपाध्यक्ष, सागर कन्या मच्छीमार संघ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()