Raigad : ग्रामीण रुग्‍णांना ‘आभा’चा आधार

सरकारी रुग्णालयात केसपेपर काढणे ही वेळखाऊ प्रक्रिया असून त्‍यासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या असतात.
सरकारी रुग्णालयात केस पेपरसाठी
सरकारी रुग्णालयात केस पेपरसाठीSAKAL
Updated on

अलिबाग : सरकारी रुग्णालयात केस पेपरसाठी, उपचारासाठी लागणाऱ्या रांगेतून आता जिल्ह्यातील रुग्णांची सुटका होणार आहे. आयुष्यमान भारत डिजिटल मिशनअंतर्गत जिल्हा रुग्णालयात ‘आभा’ हेल्थ अॅपवर नोंदणी करण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांचा वेळ व त्रास कमी झाला असून महिनाभरात दोन हजार रुग्‍णांनी नोंदणी केली आहे.

सरकारी रुग्णालयात केसपेपर काढणे ही वेळखाऊ प्रक्रिया असून त्‍यासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. अनेकवेळा ठराविक वेळेनंतर केस पेपर मिळत नाही, केस पेपर मिळाला तरी डॉक्टर उपलब्ध नसतात. यात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचे श्रम वाया जातात. काही रुग्णांना रांगेतच त्रास जाणवू लागतो. या सर्वांतून सुटका होण्यासाठी आभा अॅपच्या नोंदणीनंतर आभा हेल्थ कार्डचे वाटप आरोग्य विभागाकडून केले जाणार आहे.

सरकारी रुग्णालयात केस पेपरसाठी
Raigad : पोलादपूरमध्ये दोन ठिकाणी दरड कोसळली

‘आभा हेल्थ कार्ड’ नागरिकाच्या आरोग्याची कुंडलीच असून अधिकाधिक नागरिकांनी त्‍याचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन करण्यात येत आहे. कार्डसोबत रुग्णाच्या आरोग्याशी संबंधित संपूर्ण माहिती नोंदवली जाईल. कार्डच्या मदतीने डॉक्टर तुमच्या संपूर्ण आरोग्याच्या नोंदी पाहू शकतात. म्हणजेच कार्डद्वारे कोणत्याही रुग्णाचा वैद्यकीय इतिहास अगदी सहज शोधता येणार आहे.

सरकारी रुग्णालयात केस पेपरसाठी
Mumbai News : बंदी असतानाही वाहनांचा यू टर्न; पोलिसांचा सूचना फलक नावापुरताच

कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना माहिती

रुग्णालयात येणाऱ्या व्यक्तींना आभा अॅपद्वारे कशी नोंदणी करायची, याची माहिती देण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. कोड स्कॅन केल्यानंतर आभा हेल्थचे अॅप मोबाईलवर डाऊनलोड होते. त्यात मोबाईल क्रमांक, येणारा ओटीपी टाकल्यावर नोंदणीची प्रक्रिया सुरू होते. त्यानंतर १४ आकडी आभा क्रमांक येतो. हा क्रमांक केसपेपर खिडकीवर दाखवल्यानंतर आजाराविषयी माहिती भरून घेतली जाते. अवघ्या काही मिनिटांत टोकन क्रमांक मोबाईल येतो. टोकन क्रमांक टाकल्यावर क्षणात केसपेपर प्रिंट होऊन रुग्णांना मिळतो.

आभा हेल्थ कार्डचा उपयोग

‘आभा’ म्हणजेच आयुष्मान भारत हेल्थ अकाऊंटन्ट नंबर. हे एक डिजिटल हेल्थ कार्ड आहे ज्यात नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित माहिती साठवली जाईल. हे कार्ड आधार कार्डसारखेच असेल आणि यावरील १४ अंकी नंबरचा वापर करून रुग्णाची सगळी मेडिकल हिस्ट्री डॉक्टरला मिळेल. रुग्‍णावर कोणत्या आजारावर उपचार झाला, तो कधी व कोणत्या दवाखान्यात झाला, कोणत्या तपासण्या केल्‍या, कोणती औषधे दिली, आरोग्याच्या समस्या, रुग्‍ण आरोग्‍यविषयक कोणत्या योजनेशी जोडला गेलाय, ही माहिती कार्डच्या माध्यमातून मिळेल.

आरोग्याचा तपशील

आभा डिजिटल कार्डचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे दवाखान्यात जाताना तुम्हाला आधीच्या डॉक्टरांची चिठ्ठी, गोळ्यांचे प्रिस्‍क्रिप्शन सोबत न्यायची गरज नाही. तुमच्याकडे जुन्या चाचणीचे रिपोर्ट नसले तरी पुन्हा सगळ्या टेस्ट करायची गरज पडणार नाही. यामुळे वेळ आणि पैशाची बचत होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.