चिरगावच्या जंगलात आता गिधाडांचे राज्य! पक्षी आणि निसर्गप्रेमींमध्ये आनंद

चिरगावच्या जंगलात आता गिधाडांचे राज्य! पक्षी आणि निसर्गप्रेमींमध्ये आनंद
Updated on

महाड  - म्हसळा तालुक्यातील चिरगाव येथील गिधाड संवर्धन प्रकल्पास आवश्यक असणारे 43 हेक्टर वनक्षेत्र महाराष्ट्र सरकारच्यावतीने "संरक्षित राखीव वनक्षेत्र" म्हणून जाहीर करण्यात आले. रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी ही घोषणा केली .
पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली आमदार अनिकेत तटकरे व वनखात्याच्या ठाणे व रायगड येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत 2 फेब्रुवारीला झालेल्या विशेष बैठकीमध्ये  हा निर्णय घेण्यात  आल्याची माहिती सिस्केप संस्थेचे अध्यक्ष प्रेमसागर मेस्त्री यांनी  दिली. या बैठकीला सिस्केप संस्थेकडून प्रेमसागर मेस्त्री व गणेश खातू यांनी गिधाड संवर्धनाचे महत्व स्लाईडशोद्वारे उपस्थितांना दाखविले.

रायगड जिल्ह्यातील गिधाडांची घटती संख्या हा मोठा चिंतेचा विषय बनत चालला होता . नैसर्गिक स्वच्छतादूत म्हणून ओळख असणारे गिधाडांचे अस्तित्व  टिकून राहावे याकरता 1999 पासून प्रेमसागर मेस्त्री यांनी संस्थेच्या माध्यमातून गिधाडांच्या संवर्धनाचे काम सुरू केले. गिधाडांच्या संपुष्टात येणाऱ्या प्रजातींचा शोध घेत असताना मेस्त्री यांना म्हसळा, श्रीवर्धन येथे गिधाडाची तुरळक घरटी आढळून आली.  संपुष्टात येणाऱ्या पांढऱ्या पाठीचे गिधाड व लांब चोचीचे गिधाड या दोन प्रजातीचा या भागात जास्त संचार असल्याने त्यांनी म्हसळा येथील चिरगांव या देवराईमध्ये काम सुरु केले. गिधाड संवर्धन व संशोधन केंद्राची स्थापना करून चिरगाव बागाची  वाडी येथे प्रेमसागर मेस्त्री यांनी ग्रामस्थांसमोर या पक्षाबाबत जनजागृती केली. यामुळे या परिसरात आजमितीस साडेतीनशेहून अधिक गिधाडे पहावयास मिळतात. म्हसळा, रोहा, महाड वनविभागाने  या कामाला सहकार्य केले.

रायगड जिल्ह्यामध्ये कोठेही एखादे जनावर मृत झाले तर ते चिरगाव च्या जंगलात गिधाडांसाठी खाद्य म्हणून नेले  जाते. हे कठीण काम करत गिधाडांचे संवर्धन करण्यासाठी सिस्केप संस्थेने बावीस वर्ष अथक प्रयत्न केले व या ठिकाणी गिधाड संवर्धन क्षेत्र व्हावे यासाठी  पाठपुरावा सुरू केला होता .त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून सरकारने आता हे क्षेत्र संरक्षित म्हणून घोषित केले आहे. देश-विदेशातून अनेक पक्षी तज्ञ या संवर्धन केंद्राचा अभ्यास करण्यासाठी चिरगावला येत असतात. तसेच येथील गिधाड संवर्धनाचे कार्य देखील आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचले आहे . पालक मंत्री यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे पक्षीप्रेमी मध्ये निसर्गप्रेमी मध्ये आनंदाचे वातावरण आहे .

गिधाडांचे संवर्धन व्हावे त्यांच्या अधिवासामध्ये त्यांनी सुरक्षित राहावे. यासाठी गेली बावीस वर्षं आमचे जे अथक प्रयत्न सुरू आहेत त्याची ही पोचपावती आहे.

-प्रेमसागर मेस्त्री
( अध्यक्ष , सिस्केप )

-----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

raigad mahad latest marathi news chirgaon declare vultures protective forest by mahavikas aghadi government

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.