रायगडमध्ये सरपंचपदासाठी घोडेबाजार जोरात; उद्यापासून निवड प्रक्रिया सुरू

रायगडमध्ये सरपंचपदासाठी घोडेबाजार जोरात; उद्यापासून निवड प्रक्रिया सुरू
Updated on

अलिबाग  : गेल्या महिन्यात निवडणूक झालेल्या रायगड जिल्ह्यातील 88 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी बुधवार (ता. 10) पासून सरपंच निवड प्रक्रिया सुरू होणार आहे. गावातील प्रतिष्ठेचे हे पद असल्याने अनेक इच्छुकांनी कोणत्याही परिस्थितीत पद मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यातूनच मोठ्या प्रमाणात घोडेबाजार सुरू असल्याची चर्चा आहे. 

जिल्ह्यातील 88 ग्रामपंचायतींमध्ये 15 फेब्रुवारीला मतदान झाले होते. त्यानंतर 18 तारखेला मतमोजणी झाली होती. या वेळी सरपंचाची निवड ही सदस्यांमधून होणार असल्याने आरक्षण जाहीर झाल्यापासून अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. जिल्ह्यात औद्योगिकीकरण वाढले आहे. त्यामुळे अशा ठिकाणी सरपंचपद हे प्रतिष्ठा आणि पैसा मिळवून देणारे असते. त्यामुळे या ठिकाणी इच्छुकांची संख्या अधिक आहे. काही पर्यटनस्थळे असेलल्या गावांच्या सरपंचपदासाठीही रस्सीखेच आहे. त्यामुळे या पदाच्या निवडीच्या आधी ठिकठिकाणी घोडेबाजार सुरू झाला आहे. विशेष म्हणजे यामध्ये महिला सदस्यही मागे नाहीत. 

विशेष म्हणजे काही ग्रामपंचायतींतील नवनिर्वाचित सदस्यांच्या लोणावळा, महाबळेश्वर, गोवा या ठिकाणी सहली काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती काही कार्यकर्ते नाव न छापण्याच्या अटीवर देत आहेत. 

निवडणूक खर्च तरी द्या 
कोरोना संसर्ग सुरू असतानाच जिल्ह्यातील 88 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक झाली. या वेळी निवडणूक लढणाऱ्या अनेकांना सरपंचपदाची माळ आपल्या गळ्यात पडेल, अशी अशा होती. त्यामुळे अशा व्यक्तींनी प्रचारावर मोठा खर्च केला आहे; परंतु आरक्षणामुळे भलत्याच उमेदवाराच्या गळ्यात सरपंचपदाची माळ पडणार असल्याने किमान निवडणूक खर्च तरी मिळावा, यासाठी हे सदस्य आता त्यांच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. 
 

निवडणुकीवर दृष्टिक्षेप 
ग्रामपंचायती - 88 
बिनविरोध ग्रामपंचायती - 10 
निवडून आलेले सदस्य - 612 

बिनविरोध ग्रामपंचायती 
पनवेल - आकुर्ली, खानावले 
कर्जत - हुमगाव 
माणगाव - देवळी, टेमपाले, लाखपाले 
महाड - भेलोशी आसनपोई 
श्रीवर्धन- कारिवणे 
म्हसळा- केल्टे

------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

raigad marathi latest politics continues Sarpanch grampanchayat election political update

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.