Raigad News : माणगाव बाजारपेठेत रस्‍ते मोकळे!

गणेशोत्सवात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिस सज्‍ज
raigad
raigadsakal
Updated on

माणगाव - गणेशोत्सवासाठी मुंबई, उपनगरांसह ठाण्यातील लाखो चाकरमानी कोकण व तळ कोकणात येतात. गणेशभक्तांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुखकर व्हावा व माणगाव बाजारपेठेत होणारी वाहतूक कोंडी टळावी, यासाठी रायगड जिल्हा पोलिस तसेच नगरपंचायतीच्या संयुक्‍त विद्यमाने उपाययोजना करण्यात येणार आहेत. रस्त्यालगतची अतिक्रमणे हटवण्यात येणार आहेत;

तसेच रेल्वे स्‍थानक ते तीनबत्ती नाकादरम्यान दुभाजक बसवण्यात येणार आहेत. वाहतूक व्यवस्‍था सुरळीत ठेवण्यासाठी माणगाव पोलिस सज्ज झाले आहेत.

मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव शहरात महामार्गाच्या दोन्ही बाजूने बाजारपेठ असल्याने खरेदीसाठी सतत गर्दी असते.

या ठिकाणी बस स्थानक असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुकीवर परिणाम होतो. त्‍या अनुषंगाने रायगड जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव उपविभागीय पोलिस अधिकारी नितीनकुमार पोंदकुले, निरीक्षक राजेंद्र पाटील यांचे पथक, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष माळी, नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, वाहतूक पोलिस माणगाव बाजारपेठेतील रस्त्याची पाहणी करणार आहेत.

raigad
Beed News : स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मारकाची दुरवस्था

बाजारपेठ तसेच महामार्गालगत वाहने उभी न करता पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. महामार्गालगत असणाऱ्या गटारावरील हातगाडे हटवण्यात येणार आहेत. खोदलेले नाले, गटारे भरण्याच्या सूचना ठेकेदाराला केल्‍या आहेत.

माणगाव बाजारपेठेमध्ये बॅरिकेट्स लावण्यात येणार आहेत. महामार्ग तसेच पर्यायी मार्गावर जागोजागी दिशादर्शक फलक लावले जातील. १० ते १५ वाहतूक पोलिस व प्रत्येक पॉइंटला २० ते २५ पोलिसांचा बंदोबस्त असेल.

raigad
Nagpur News : ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र अवैध, नोकरी धोक्यात

गणेशोत्सवात खरेदी करण्यास येणाऱ्या तसेच मुंबई-गोवा महामार्गाने येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था असेल. अनधिकृत पार्किंग केल्यास चालकावर कारवाई केली जाणार आहे. कचेरी रोड, मोर्बा रस्‍ता, निजामपूर मार्ग व महामार्गावरील मुख्य बाजारपेठेत पदपथावरील फेरीवाले, हातगाडे व्यावसायिकांनीही सूचना करण्यात आल्‍या आहेत.

raigad
PM Modi: 'D येणार आणि C जाणार..', 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे पंतप्रधान मोदींचा फॉर्मूला काय आहे? जाणून घ्या

चार ठिकाणी स्‍पीकरवरून सूचना

मुंबईहून येणाऱ्या परिवहन महामंडळाच्या बससाठी एमआरएफ टायर शोरूमसमोर बस थांबा असेल. जेणेकरून बाजारपेठेत वाहतूक कोंडी होणार नाही. तसेच बाजारपेठेतील रिक्षा थांब्‍यावर एकच रिक्षा उभी राहील तर उर्वरित रिक्षा बाजूला उभ्‍या केल्‍या जातील. नंबर आल्यानंतर एक-एक रिक्षा प्रवाशांसाठी उभी राहील. मुख्य बाजारपेठेत महत्त्वाच्या चार ठिकाणी स्पीकरवरून सूचना दिल्या जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.