रायगडमध्ये २४ तासात नऊ दुचाकी, तीन मिनीबस जळून खाक

रायगडमध्ये २४ तासात नऊ दुचाकी, तीन मिनीबस जळून खाक
Updated on

मुंबईः  कर्जत तालुक्यातील नेरळ जवळील पिंपलोली गावामध्ये रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन मिनीबस अज्ञात इसमांनी लावलेल्या आगीत जळून खाक झाल्या आहेत. स्कूल बस म्हणून सेवा देत असलेल्या या सर्व मिनीबस पिंपलोली गावातील नेरळ-सुगवे रस्त्याच्या कडेला उभ्या होत्या. दरम्यान,17 नोव्हेंबरला संध्याकाळी सात वाजता बँड पथकातील दोन गटात वाद झाले होते.

नेरळ पोलिस ठाणे हद्दीत पिंपलोली गाव असून या गावातील चंद्रकांत सोनावळे यांनी काही वर्षापूर्वी स्कूल बसचा व्यवसाय सुरू केला. सध्या त्यांच्याकडे तीन मिनीबस आहेत. नेरळ-कर्जत रस्त्यावर असलेल्या हाजी लियाकत स्कूलमधील विद्यार्थ्यांना स्कुल बस म्हणून सेवा देत होते. साई एकविरा ट्रान्सपोर्ट या नावाने चंद्रकांत सोनावळे हे पिंपलोलीकर या नावाने वाहतूक व्यवसाय करायचे. पिंपलोली गावातील बँड पथकाला आर्थिक मदत देखील सोनावळे करायचे आणि गावात आणखी एक बँड पथक कार्यरत आहे. नजीकच्या काळात लग्नसराई सुरू होणार असून पिंपलोली गावातील बँड पथक हे 17 नोव्हेंबर रोजी नेरळ-कळंब रस्त्यावर पिंपलोली एसटी स्टँड परिसरात सराव करीत होते. त्यावेळी तेथे बँड पथकातील तरुणांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली होती. त्याबाबत नेरळ पोलिस ठाण्यात तक्रार देखील रात्री नोंदविण्यात आली होती.

पोलिसात तक्रार नोंदवून आल्यानंतर गावात शांतता असताना रात्री 11 वाजून 8 मिनिटांनी चंद्रकांत सोनावळे यांच्या साई एकविरा ट्रान्सपोर्टच्या तीन मिनीबस यांना आग लागली होती. गावाच्या बाहेर रस्त्याच्या कडेला लावलेल्या मिनीबसला लागलेली आग एवढी भयानक होती की आग विझविणे कोणालाही शक्य झाले नाही. 

या आगीत एमएच 04-बीयु 3163,एमएच 02-पीके 0324 आणि एमएच 06,जे 9604 या तीन मिनीबस आगीत जळून गेल्या. त्यानंतर नेरळ पोलिसांना मिनीबसचे मालक चंद्रकांत सोनावळे यांनी त्याबाबत माहिती दिली असता पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहचले .मात्र तोपर्यंत त्या सर्व मिनीबस जळून खाक झाल्या होत्या.
या आगीत साधारण 18 लाखांचे नुकसान झाले आहे. नेरळ पोलिस ठाण्यात अज्ञात इसमांविरुद्ध आग लावून गाड्यांची नासधूस केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उरणमध्ये दुचाकी जळून खाक 

सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास उरण शहरालगत असलेल्या भवरा परिसरात घराजवळ लावलेल्या मोटारसायकल जाळण्यात आल्या होत्या. डोंगरावर असलेल्या वस्तीमुळे घराजवळ असलेल्या रिकाम्या जागेत गेल्या अनेक वर्षांपासून या मोटारसायकल लावण्यात येत होत्या. सोमवारी मध्यरात्री याठिकाणी लावण्यात आलेल्या गाड्यांनी अचानक पेट घेतल्याचं दिसलं आणि नऊ गाड्या आणि दोन सायकल जळून खाक झाल्या.

----------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

In Raigad nine two wheelers and three minibuses were burnt in 24 hours

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.