Raigad : पांगारा, काटेसावर आदी फुले बहरतील

फुलांनी बहरलेली झाडे अनेक पशू-पक्ष्यांना खाद्य व आश्रय देतात.
निसर्गप्रेमी
निसर्गप्रेमी sakal
Updated on

फुलांचा रंगोत्‍सव

फुलांनी बहरलेली झाडे अनेक पशू-पक्ष्यांना खाद्य व आश्रय देतात. त्यामुळे येथे पक्ष्यांचा किलबिलाट असतो, अशी माहिती पाटणूसचे निसर्ग अभ्‍यासक राम मुंडे यांनी दिली; तर उशिरा पडलेली थंडी, उष्मा व गारठा अशा बदलत्या वातावरणामुळे यंदा पळस वेळेआधी फुलला आहे. काही दिवसांनी पानगळीला सुरुवात होईल व पांगारा, काटेसावर आदी फुले बहरतील. निसर्ग व पक्षी अभ्यासकांना ही पर्वणी आहे. हा नजारा पाहण्यासाठी अनेक पर्यटक परिसराला भेट देत असल्‍याचे निसर्गप्रेमी अमित निंबाळकर यांनी सांगितले.

‘फ्लेम ऑफ द फायर’- पळसाची फुले

‘फ्लेम ऑफ द फायर’ म्हणून ज्याचे वर्णन केले जाते, त्या पळसाची लाल व भगव्या रंगाच्या फुलांचा बहर आला आहे. डोंगराळ भाग, रस्त्याच्या कडेला आणि शेताच्या बांधावरील पळसाच्या झाडावरील हा रंगोत्‍सव अनेकांना मोहीत करतो. या फुलांना ज्वालाफुले असे संबोधले जाते. एका ब्रिटिश अधिकाऱ्याने पळसाच्या फुलांच्या लालभडक रंगावरून त्‍याला ‘फ्लेम ऑफ द फायर’ हे नाव दिले आहे.

भरगच्च बहरलेले गिरिपुष्प

गिरिपुष्प याला ‘ग्लिरिसिडिया’ असे नाव आहे. हा पानझडी वृक्ष असल्यामुळे पाने गळून गेल्यानंतर फांद्यांच्या टोकांवर निळी-जांभळी फुले गुच्छात येतात. फुलांनी बहरलेले गिरिपुष्प झाड फार सुंदर दिसते. या झाडाची फुले शोभेसाठी वापरली जातात. या झाडांच्या बिया उंदरांनी खाल्ल्यास उंदीर मरतात. त्‍याच्या हिरव्या पानांपासून कंपोस्ट खत तयार होते.

देवाला आवडणारा देवचाफा

देवचाफ्याची फुले पांढरी असून मध्यभागी पिवळसर झाक असते. खोड राखाडी रंगाचे असते व खोडाला पारंब्या असतात. ही फुले किंवा या फुलांचा हार देवाला वाहतात. म्हणून सहसा हे झाड देवळाबाहेर लावलेले दिसते. रस्त्याच्या दुतर्फाही अनेक झाडे दृष्टीस पडतात. त्‍याचा मंद सुवास सर्वत्र दरवळत असतो. देवचाफ्याप्रमाणेच सोनसाफ्याचा सुगंधही अनेकांना मोहीत करतो. नवरात्रीत अथवा गणेशोत्‍सवात चाफ्यांचा फुलांना विशेष मान असतो. पावसाळ्‌यात सोनचाफ्याला बहर येतो, मात्र थंडी पडताच पाणगळ सुरू होते.

मनमोहक गुलमोहर

पिवळा गुलमोहर किंवा ताम्रशिंपी असेही म्हणतात. कळ्या धरू लागल्या की तांबूस-तपकिरी भुकटीत घोळलेल्‍या मण्यांसारखे सुरेख दिसतात. मग एकेक मणी फोडून नाजूक पिवळ्या पाकळ्यांची फुले बाहेर पडू लागतात आणि सर्व झाड पिवळेधमक होते. झाडाच्या तळाशी गळून पडलेल्या फुलांची आणि पाकळ्यांची सजावट होते. सध्या पिवळ्या गुलमोहराला बारीक कळ्या येऊ लागल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.