Raigad Rain: रायगडमध्ये मुसळधार पाऊस, जिल्ह्यात दोन दिवस ऑरेंज अलर्ट; अतिवृष्टीचा अंदाज, जिल्‍हा प्रशासन सज्‍ज

Raigad Rain
Raigad Rainesakal
Updated on

अलिबाग : जिल्ह्यामध्ये शनिवारपासून पावसाचे आगमन झाले असून एक जुलैपर्यंत जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवली आहे. या कालावधीत ३० जूनपर्यंत ऑरेंज व १ जुलैपर्यंत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. किनारी भागात डोंगराच्या पायथ्‍याशी-दरडप्रवण क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांना जिल्‍हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पावसामुळे पोलादपूरकडून महाबळेश्‍वरकडे जाणारा आंबेनळी घाटामध्ये मंगळवारी रात्री कालिका माता पॉईंटजवळ दरड कोसळली. त्यामुळे दोन्ही मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली असून जीवितहानी थोडक्‍यात टळली. जिल्ह्यात अलिबाग, रोहा, पोलादपूर तालुक्‍यातील जवळपास वीज घरांची पडझड झाली तर दोन ठिकाणी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे.

चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे माणगाव तालुक्यातील लाखपाले येथे दगड कोसळली. या घटनेनंतर स्थानिक प्रशासनाने तातडीने तेथील वीस जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले. त्यात ४ कुटुंबांचा समावेश असून सध्या ते नातेवाईकांकडे स्थलांतरित झाल्‍याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

म्हसळा तालुक्यातील २० पेक्षा घराचे पत्रे वादळामुळे उडून गेल्याने सुमारे १५ लाखांचे नुकसान झाले आहे. पावसाचा जोर पुढील काही दिवस असाच राहणार असल्‍याने ३० जूनपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन

पावसाळ्यात नागरिकांना आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने प्रत्येकाने वैयक्‍तिक स्वच्छतेसह परिसरातही स्वच्छता राहील, याची काळजी घ्यावी. पाणी उकळून प्यावे, साथीच्या आजाराची लक्षणे असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार सुरू करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

एक तास वाहतूक बंद

पावसाने जोर कायम राहिल्‍याने अलिबाग-रेवस मार्गावरील मानिफाटा येथे बुधवारी दुपारी पावणे बाराच्या सुमारास रस्त्यालगतचे वडाचे झाड उन्मळून पडले. त्यामुळे वाहतूक एक तास बंद झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ जेसीबी, कामगारांच्या मदतीने झाडाच्या फांद्या छाटून एका बाजूकडील वाहतूक पूर्ववत केली. एसटी सेवेवर त्याचा परिणाम झाल्याने अलिबाग -रेवसकडे जाणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.

Raigad Rain
Mumbai : पहिल्याच फेरीत 'वंदे भारत' ट्रेनची ६.४८ लाखांची कमाई! २४ मिनिटांपूर्वीच पोहोचली मडगावात

आजारांचा प्रादुर्भाव

पावसाळ्यात पिण्याचे पाणी गढूळ होत असल्‍याने कॉलरा, विषमज्वर, गॅस्ट्रो, हगवण अशा आजारांचा प्रादुर्भाव होतो. तसेच उघड्यावरील खाद्यपदार्थांवर माशा बसून उलट्या, जुलाब, कावीळ असे आजार होतात. याबाबत काही लक्षणे आढळल्यास त्वरित जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा इतर शासकीय रुग्णालयांमध्ये जाऊन उपचार घेण्याचे आवाहन करण्यात आले. पाणी स्‍त्रोतांचा परिसर स्वच्छ ठेवावा, अशा सूचना जिल्हा परिषद प्रशासनाने केल्या आहेत.

महाडमध्ये २६ पर्जन्यमापक यंत्रे

पोलिस विभागाच्या वायरलेस यंत्रणा, हॅम रेडिओच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय कार्यालय, तहसीलदार कार्यालयांमध्ये संपर्क व्यवस्था अबाधित राखण्याचे नियोजन केले आहे. माथेरान, रायगड किल्ला, महाड-गणेश टेकडी या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे रिपीटर स्टेशन व महाड परिसरात वायरलेस कम्युनिकेशन यंत्रणा उभारली आहे. ८२ महसूल मंडळ केंद्रांवर स्वयंचलित हवामान केंद्र तसेच महाड तालुक्यात २६ पर्जन्यमापक यंत्रे बसविण्यात आली आहेत. मोबाईल टॉवरला अखंडित वीजपुरवठा होण्यासाठी जनरेटर सज्ज ठेवले आहेत. याव्यतिरिक्त अतिरिक्त संपर्क व्यवस्था म्हणून २१ सॅटेलाईट फोनही उपलब्ध ठेवले आहेत.

Raigad Rain
Mumbai News: वृक्ष कोसळून तरुणाचा मृत्यू, दिवसभरातील दुसरी दुर्घटना

प्रशासनाकडून उपाययोजना

जिल्ह्यातील ३०० प्रशिक्षित आपदा मित्र तसेच नोडल अधिकारी नेमण्यात आले आहेत. महाड, रोहा, पेण, माणगाव, कर्जत आदी शहरांमधील प्रमुख नद्यांच्या आजूबाजूच्या परिसरात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण होते. या परिस्थितीत नागरिकांचे स्थलांतर तसेच तातडीने मदत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दोन रबरी बोटी सज्ज ठेवल्या आहेत. महाड तालुक्यातील ग्रामीण आणि शहरी भागात २० ठिकाणी अलर्ट सिस्टीम यंत्रणा उभारली आहे. महाड शहराजवळून जाणाऱ्या नदीवर दोन ठिकाणी रिव्हर लेव्हल गेज बसविण्यात आले आहेत.

आंबेनळी घाटात मंगळवारी रात्री दरड कोसळून वाहतूक खोळंबली होती. घाटात धुके असल्याने रात्री बॅरिकेट लावून वाहतूक थांबवली होती. बुधवारी सकाळी रस्त्यावरील मलबा व मुरूडमिश्रित दगडे बाजूला करण्यात आले. मात्र पुन्हा आंबेनळी घाटामध्ये दरड कोसळली असल्याने घाट दोन्ही बाजूकडून वाहतुकीसाठी तात्पुरता बंद करण्यात आला आहे. प्रवाशांनी ताम्हिणी घाटातून जाणाऱ्या मार्गाचा अवलंब करावा.

- सोमनाथ घार्गे, पोलिस अधिक्षक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.