Railway: खा.बाळ्या मामा घेणार रेल्वे मंत्र्याची भेट, जाणून घ्या काय आहे कारण?

Ghardi : प्रलंबीत प्रकरणांची तपशीलवार माहिती सादर करण्याच्या सूचना रेल्वे अधिकारी वर्गाला दिल्या आहेत
Railway: खा.बाळ्या मामा घेणार रेल्वे मंत्र्याची भेट, जाणून घ्या काय आहे कारण?
Railwaysakal
Updated on

Bhiwandi Latest Update : भिवंडी लोकसभेचे खासदार बाळ्यामामा उर्फ सुरेश म्हात्रे यांनी 8 जुलै रोजी शहापुर विधानसभा मतदारसंघातील तालुक्यातील महत्वाचे रेल्वे स्थानक असलेले आसनगाव स्थानकात भेट देऊन पाहणी केली तेव्हा कल्याण कसारा रेल्वे पॅसेंजर असोसिएशन आणि कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेने रेल्वे समस्या आणि प्रश्नांचा अक्षरशः खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांच्यापुढे तक्रारीचा पाढा वाचला.

Railway: खा.बाळ्या मामा घेणार रेल्वे मंत्र्याची भेट, जाणून घ्या काय आहे कारण?
Nashik Railway : सलग दुसऱ्या दिवशी ‘पंचवटी’सह अनेक गाड्या रद्द! नाशिकच्या प्रवाशांचे हाल

यात आसनगाव होम प्लॅटफॉर्म , पूर्व पश्चिम पूल,कल्याण कसारा तिसरी -चौथी लाईन,.लांब पल्ल्याच्या मेल-एक्सप्रेस रगाडयांना कसारा येथे थांबा मिळावा, आसनगाव, कसारा लोकल वाढवणे असे मूलभूत प्रश्न खासदार यांच्या समोर मांडले आहेत.याबद्दल रेल्वे अधिकारी यांनी काही राज्य सरकारच्या परवानगीची अडचणी सांगितल्याने खासदार बाळ्यामामा यांनी राज्यसरकार कडील प्रलंबीत प्रकरणांची तपशीलवार माहिती सादर करण्याच्या सूचना रेल्वे अधिकारी वर्गाला दिल्या आहेत.

Railway: खा.बाळ्या मामा घेणार रेल्वे मंत्र्याची भेट, जाणून घ्या काय आहे कारण?
Central Railway : आठवड्याच्या पहिल्याच पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प

कल्याण कसारा रेल्वे संघटनेकडून अध्यक्ष शैलेश राऊत, सचिव उमेश विशे, रेल्वे प्रवासी महासंघ सरचिटणीस जितेंद्र विशे, महेश तारमाळे,अजय गावकर, कल्याण कसारा कर्जत संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव, विभागीय अध्यक्ष विजय देशेकर, राहुल दोंदे, आकाश डोळस, आरती भोईर, युवराज पंडित, रेल्वे महासंघचे नंद कुमार देशमुख, माजी आमदार पांडुरंग बरोरा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार गट ) विद्या वेखंडे, मनोज विशे आणि पदाधिकारी, रिक्षा संघटनेचे पदाधिकारी आणि नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

"आसनगाव, वासिंद, कसारा मार्गावरील रेल्वेच्या समस्या सोडविण्याबाबत लवकरच रेल्वे मंत्र्यांशी भेट घेऊन चर्चा करण्यात येईल,रेल्वे संदर्भात राज्य सरकारच्या काही अडचणी संबंधित अधिकाऱ्याशी बोलून सोडविण्याचे प्रयत्न करू."बाळ्यामामा उर्फ सुरेश म्हात्रे, खासदार, भिवंडी लोकसभा.

Railway: खा.बाळ्या मामा घेणार रेल्वे मंत्र्याची भेट, जाणून घ्या काय आहे कारण?
Railway Police Bharti: पुणे लोहमार्ग पोलिस भरतीची रविवारी होणार लेखी परिक्षा; उमेदवारांनी कोणती काळजी घ्यावी? जाणून घ्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.