जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतूकीतून रेल्वेची बक्कळ कमाई! वाचा बातमी

जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतूकीतून रेल्वेची बक्कळ कमाई! वाचा बातमी
Updated on

मुंबई: लॉकडाऊन काळात रेल्वे मंत्रालयाने प्रवासी वाहतूक बंद केली. त्यामूळे रेल्वेला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला. मालवाहतूकीवर भर देऊन हा तोटा कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामूळे लाॅकडाऊनदरम्यान जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करून रेल्वेने सुमारे 3 कोटी 8 लाख रूपयांची कमाई केली आहे. यात पश्चिम रेल्वेने सर्वाधिक कमाई केली आहे. 

रेल्वेने जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतूकीसाठी विशेष मालगाडी, पार्सल गाड्या सुरु केल्या. 8 ते 17 एप्रीलदरम्यान रेल्वेने देशभरातील पार्सल गाड्यांची वाहतूक करून 3 कोटी 8 लाख रुपयाचे उत्पन्न मिळवले. यामध्ये 1 कोटी 59 लाखांचा वाटा पश्चिम रेल्वेचा आहे. त्यामुळे कमाईच्या बाबतीत पश्चिम रेल्वे देशातील सर्व रेल्वे विभागातून अव्वल ठरली आहे.  
सध्या रेल्वे मार्गावर फक्त मालगाडी आणि पार्सल गाडी धावत आहे. याद्वारे देशभरात नागरिकांना दुध, धान्य, इंधन यासारख्या जीवनावश्यक वस्तू आणि औषधांचा पुरवठा केला जात आहे. आतापर्यंत 30 लाख 17 हजार टन जीवनावश्यक साहित्याची वाहतूक करण्यासाठी 1 हजार 721 माल डबे वापरण्यात आले आहे. मुंबई सेंट्रल ते फिरोजपूर, दादर ते भुज यासह अन्य भागातून पार्सल गाड्या धावणार असल्याचे पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.