Railway Food News: आता रेल्वेतच मिळणार गरमागरम जेवण, कसे? जाणून घ्या संपुर्ण माहीती

मुंबई, पुणे आणि नागपूरसाठी ही सेवा लवकरच सुरू करण्यात येणार आहे | The service will be launched soon for Mumbai, Pune and Nagpur
Railway Food News
Railway Food Newssakal
Updated on

Railway News: रेल्वे प्रवास सुरू असतानाच आता प्रवाशांना हॉटेलमधून ताजे आणि गरमागरम जेवण मागवता येणार आहे.

यासाठी ‘आयआरसीटीसी’ने नुकताच ‘स्विगी’ या कंपनीसोबत करार केला आहे. त्यामुळे मुंबई, पुणे आणि नागपूरसाठी ही सेवा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. (how to get delicious and hot food in railway)

Railway Food News
Railway Food Track : कूकला झापड अन् अधिकाऱ्यांनाही सुनावले!

मेल-एक्स्प्रेस रेल्वे गाड्यात चवदार आणि गरमागरम जेवण उपलब्ध करुन देण्यासाठी आयआरसीटीसी सातत्याने काम करत आहे. याकरीता आयआरसीटीसीने ऑनलाईन फूड डिलिव्हरी ॲप ‘स्विगी’सोबत करार केला आहे. त्यामुळे आता प्रवाशांना फलाटावरचे किंवा पॅन्ट्री कारमध्ये तयार केलेले अन्न खाण्याची आवश्यकता नाही.swiggy order in Railway cdj98

स्विगीच्या माध्यमातून धावत्या रेल्वेत आवडीचे गरमागरम जेवण ते ऑर्डर करू शकतील. सध्या ही सुविधा रेल्वेच्या ए-१ आणि ए-२ श्रेणीच्या स्थानकांवर उपलब्ध असेल. देशभरात या श्रेणीतील ३५० हून अधिक स्थानके आहेत. बेंगळुरू, भुवनेश्वर, विजयवाडा आणि विशाखापट्टणम या चार स्थानकांवरून याची सुरुवात होईल. पुढच्या सहा महिन्यांत ६० रेल्वे स्थानकांवर ही सुविधा उपलब्ध होईल.(railway news seam for hot food)

Railway Food News
Police Trainee Food Poisoning: प्रशिक्षणार्थी पोलिसांना जेवणातून विषबाधा, ८ जण रुग्णालयात दाखल; तपासणीसाठी पाठवले नमुने

मुंबईत लवकरच सेवेला सुरुवात


रेल्वेच्या ए-१ श्रेणीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई सेंट्रल टर्मिनस, वांद्रे टर्मिनस सारख्या रेल्वे स्थानकांचा समावेश होतो. या ठिकाणांवरून दररोज ५० पेक्षा जास्त मेल-एक्स्प्रेस गाड्या सुटतात.

सध्या मुंबई आणि राज्यातील महत्वाच्या स्थानकांवर ही सेवा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. स्विगीद्वारे रेल्वे स्थानकाजवळच्या हॉटेलची यादी तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.(Railway News Latest Update mumbai)

Railway Food News
Nagpur Food Poisoning: महाशिवरात्रीचा उपवास सोडण्यासाठी खाल्लं शिंगाड्याचं पीठ अन् अचानक...शंभरावर नागरिकांना विषबाधा

असे करा प्री-ऑर्डर


- जेवणाच्या प्री-ऑर्डरसाठी आयआरसीटीसी ॲपवर लॉगीन करा.
- पीएनआर नंबर टाका
- ऑर्डर कुठल्या स्थानकावर पाहिजे ते निवडा
- स्विगीवरच्या यादीतील रेस्टारंट निवडा
- स्थानक आल्यावर तुमच्या सिटवर जेवणाची डिलिव्हरी होईल.


इन्सुलेटेड बॅगमध्ये जेवण


रेल्वे प्रवाशांना दिले जाणारे अन्न गरम आणि ताजे ठेवण्यासाठी इन्सुलेटेड स्विगी बॅगमध्ये पॅक केले जाईल. स्विगीचा डिलिव्हरी पार्टनर त्या स्थानकावरील फलाटावर पोहोचेल. ग्राहकाला अन्न सुपूर्द करेल आणि रिसिप्ट घेईल. रेल्वेत डिलिवरी करणाऱ्यांना स्विगी आणि आयआरसीटीसीच्या संयुक्त विद्यमाने विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे.(railway News for delicious food)

Railway Food News
Jamnagar Street Food : बिल गेट्स यांची डॉलीसोबत चाय पे चर्चा झाली, विदेशी पाहुण्यांसाठी 'हे' आहेत जामनगरमधले टपरी ऑप्शन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.