मुंबई : पश्चिम रेल्वेत (Western Railway) पदोन्नतीच्या परीक्षेत (Promotional Exam) सर्वाधिक गुण मिळवून देखील कमर्शियल इंस्पेक्टर (Commercial Inspector) पदापासून मराठी रेल्वे कर्मचाऱ्याला (Marathi railway Employee) वंचित ठेवले आहे. तर, या जागेवर नियमांना छेद देत कमर्शियल इंस्पेक्टर पदावर दुसऱ्यालाच निवडण्यात आले आहे, अशी धक्कादायक माहिती मिळाली आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वे (Western Railway) मराठी रेल्वे कर्मचाऱ्याला डावलत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ( Railway Government neglects Marathi employee promotion of commercial inspector)
पदोन्नतीसाठी कमर्शियल अप्रेंटिस परीक्षा जून 2018 रोजी होती. त्यानंतर या परिक्षेचा निकाल सप्टेंबर 2018 रोजी लागला. या परीक्षेत 56 उमेदवार उत्तीर्ण झाले. या परीक्षेत कमर्शियल इंस्पेक्टरची जागा जनरल उमेदवारांसाठी राखीव होती. मात्र, जनरल आरक्षणामध्ये सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या उमेदवाराची कमर्शियल इंस्पेक्टर निवड होणे अपेक्षित होते. मात्र, रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी नियम डावलून गुण तालिकेत 13 वा क्रमांक असलेल्या उमेदवाराची कमर्शियल इंस्पेक्टर निवड जून 2021 मध्ये केली आहे. त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे. कमर्शियल इन्स्पेक्टरच्या पदावर रेल्वेने नियमाची अंमलबजावणी केली नसल्याचे पश्चिम रेल्वेचा वाणिज्य विभागातील परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.
रेल्वे विभागात कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी विभागीय परीक्षा घेतल्या जातात. परीक्षांच्या गुणांवर आणि योग्यतेनुसार त्या कर्मचाऱ्यांची निवड केली जाते. पश्चिम रेल्वेच्या वाणिज्य विभागाकडून 56 जागेसाठी कमर्शियल अप्रेंटिस परीक्षा घेतली होती. या 56 जागेपैकी एक जागा कमर्शियल इंस्पेक्टर आणि उर्वरित जागा बुकिंग क्लर्कसाठी आहे. रेल्वे नियमानुसार, कमर्शियल अप्रेंटिस परीक्षेत सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या उमेदवाराला कमर्शियल इंस्पेक्टर या पदावर निवड केली जाते. मात्र, पश्चिम रेल्वेकडून सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या उमेदवाराला डावलण्यात आल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, यासंदर्भातील माहिती घेऊन कळवितो, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.