Railway News: दाट धुक्यातही मेल- एक्सप्रेस गाड्या धावणार सुसाट; रेल्वेने बसविले 'हे' सुरक्षा यंत्र!

Indian Railway New Rule
Indian Railway New Ruleesakal
Updated on

Railway News: दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्याने मेल- एक्सप्रेस गाड्यांची गती कमी होती. त्यामुळे लांबपल्याचा रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम पडतोय. मात्र, आता मध्य रेल्वेने मेल- एक्सप्रेस गाड्यांच्या इंजिनमध्ये धुके सुरक्षा यंत्र बसविण्यात आले आहे. त्यामुळे दाट धुक्यातही मेल- एक्सप्रेस गाड्या सुरक्षित आणि अधिक गतीने धावण्यास मदत होणार आहेत.

ढगाळ आणि धुक्याच्या वातावरणामुळे दृश्यमानता कमी झाल्याने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून लोको पायलेटला रेल्वे गाड्यांची गती कमी करावीत लागते. त्यामुळे रेल्वे वाहतुकीला ही फटका बसतोय. मात्र,आता मध्य रेल्वेने धुके सुरक्षा यंत्राचा वापर करून धुक्याच्या वातावरणात रेल्वेच्या सुरक्षेसाठीची मोठी झेप घेतली आहे.

Indian Railway New Rule
Central Railway News: प्रयागराजवरील अपग्रेडशनमुळे मध्य रेल्वेच्या 6 रेल्वे रद्द; काही गाड्यांचा मार्ग बदलविला

सिग्नल दृश्यमानता कमी असताना रेल्वे चालकांना मदत करण्याच्या उद्देशाने, हे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान मोठी मदत म्हणून काम करते, कमी दृश्यमानतेशी संबंधित जोखिम लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. धुके सुरक्षा यंत्र हे धुके जीपीएस तंत्रज्ञानावर चालते, जे रेल्वे चालकांना आगामी तीन सिग्नल्सबाबत ऑडिओ आणि व्हिज्युअल संकेतांद्वारे लोको पायलेटला आगाऊ सूचना देण्याचे काम करते.

या उपकरणामुळे केवळ पुढील सिग्नलचे वर्णन दाखवत नाही तर इंजिन आणि सिग्नलमधील मध्यवर्ती अंतर देखील लोको पायलेट याना सूचित करते तसेच आगामी बदलांसाठी योग्य तयारी सुनिश्चित करते. विविध रेल्वे मार्गावरील सर्व सिग्नल्स आणि लेव्हल क्रॉसिंग गेट्स जीपीएस स्थानांद्वारे काळजीपूर्वक मॅप केले गेले आहेत आणि सर्वसमावेशक कव्हरेज सुनिश्चित करून डिव्हाइसमध्ये प्रोग्राम केले आहेत.

अलर्ट यंत्रणा-

धुक्याच्या वातावरणामुळे दृश्यमानता कमी झाल्याने रेल्वे गाड्यांच्या वास्तविक स्थानाच्या ५०० मीटर आधी सिग्नलचे दिशा जाहीर करून, रेल्वे चालकांना त्यांच्या गाड्या सुरक्षितपणे हाताळण्यासाठी अधिक अलर्ट देतात. त्यामुळे लोको पायलेटला धुक्याच्या वातावरणा गाड्या चालविताना मोठी मदत होते.

Indian Railway New Rule
Railway News : सातारा-कोरेगाव मार्गावर मालगाडीचे दोन डबे रेल्वे रुळावरून घसरले; तीन तास रेल्‍वे वाहतूक ठप्प

मेल- एक्सप्रेस गाड्यांची गती वाढणार -

धुक्यामुळे कमी दृश्यमानतेमुळे ट्रेनचा वेग सामान्यतः ३०-६० किमी प्रतितास दरम्यान असतो. तथापि, फॉग सेफ्टी डिव्हाईस (एफएसडी ) च्या अंमलबजावणीमुळे जास्तीत जास्त मेल- एक्सप्रेस गाड्यांचा वेग ७५ किमी प्रतितास होऊ शकतो, ज्यामुळे ट्रेनचा खोळंबा करणारा कालावधी कमी होतो आणि मेल - एक्सप्रेसच्या वक्तशीरपणा वाढतो.

धुके सुरक्षा यंत्र

• मुंबई विभाग: १० उपकरणे

• भुसावळ विभाग: २४८ उपकरणे

• नागपूर विभाग: २२० उपकरणे

• सोलापूर विभाग: ९ उपकरणे

• पुणे विभाग: १० उपकरणे

Indian Railway New Rule
Railway News: रेल्वे स्टेशनवर करत होते अनाधिकृत व्यवसाय; फेरीवाल्यांवर मध्य रेल्वेची बंपर कारवाई !

५०० फॉग सेप्टी डिव्हाईस खरेदी करणार -

मध्य रेल्वेने पहिल्या टप्प्यात नागपूर आणि अमरावतील विभागाला सर्वाधिक फॉग सेप्टी डिव्हाईस वितरित केली आहे. त्यानंतर आता आणखी ५०० डिव्हाईस खरेदी करण्यासाठी ऑर्डर नोंदवली आहे. त्यापैकी मुंबई विभागाला १२०, सोलापूर ८०, पुणे ८०, नागपूर १२० आणि भुसावळ विभागाला १०० डिव्हाईस दिली जाणार आहेत. त्यामुळे खंडाळा, कसारा घाट मार्गावरील धुक्यामुळे गाड्यांचा कमी होणारा वेग वाढणार आहे.

Indian Railway New Rule
Railway News: रेल्वे अपघातातील जखमी प्रवाशांना मिळणार तत्काळ उपचार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.