Railway News: विनातिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेकडून तिकीट तपासणी केली. परंतु फुकटे प्रवासी सुधारत नाही.
या फुकट्या प्रवाशांना टीसींनी चांगला धडा शिकवला असून त्यांच्याकडून कोट्यवधींचा दंड वसूल केला आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या तीन तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी एक कोटी रुपयांच्या महसुली उत्पन्नाचा टप्पा ओलांडला आहे.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात प्रवासी तिकीट निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले मोहम्मद शम्स चांद यांनी २०२३-२४ या आर्थिक वर्षात अवैध आणि अनियमित तिकिटांच्या १०,६८६ प्रकरणांमधून दंडाद्वारे १ कोटी रुपयांचा महसूल मिळवून एक नवा विक्रम स्थापित केला आहे. हा रेल्वे मंडळाच्या उत्पन्नातील प्रवासी महसूलाचा मोठा वाटा आहे.
मोहम्मद शम्स चांद यांनी यापूर्वी २०२१-२२ या आर्थिक वर्षात १.२५ कोटी रुपयांची महसुली उत्पन्नाची अशीच कामगिरी केली होती.
आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये मुंबई विभागात चांद यांच्यासह तिकीट तपासणीच्या एक कोटीच्या क्लबमध्ये १०,४२८ प्रकरणांमधून १,००,०२,८३० रुपयांच्या महसूल मिळवणारे मुख्य तिकीट निरीक्षक सुनील नैनानी आणि ११,३६७ प्रकरणांमधून १,०१,३२,८७० च्या महसूल मिळवणारे मुख्य तिकीट निरीक्षक एम एम शिंदे यांचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.