Railway News: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात मोटरमनचे ३० टक्के पदे रिक्त असल्याची माहिती आरटीआयतुन समोर आली. त्यामुळे सध्या कार्यकारत असलेल्या मोटरमनवर कामाचा अतिरिक्त ताण येत असल्याचे स्पष्ट झाले.
काही दिवसापूर्वी अतिरिक्त कामाच्या ताणामुळे एका मोटरमनकडून सिग्नल ओलांडण्याची घटना घडली होती. त्यानंतर त्याने रेल्वे समोर उडी घेवून आत्महत्या केली होती. सदर घटनेनंतर मुंबईतील मोटरमनच्या रिक्त पदांचा प्रश्न ऐरणीवर आला होता.
सध्या मध्य रेल्वेवर दररोज १ हजार ८१० लोकल फेऱ्यातून सुमारे ४० लाख प्रवासी प्रवास करतात. एका लोकलमधून पीक अवरच्या वेळी सुमारे ४ ते ५ हजार प्रवासी असतात. प्रवाशांच्या सुखरुप प्रवासाची जबाबदारी मोटरमनवर असते. त्यामुळे लोकलच्या सुरळित आणि सुरक्षित वाहतुकीत मोटरमनची भुमिका महत्वपुर्ण आहे. मात्र, मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात मोटरमनची संख्या कमी असल्याने कामाचा ताण कर्तव्यावर असलेल्या मोटरमनवर येतो. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात मोटरमनचे १ हजार ७६ पदे मंजूर आहे. मात्र, मंजूर पदापैकीं फक्त ७६३ मोटरमन कार्यरत असून ३१३ पदे रिक्त असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अजय बोस यांच्याआरटीआयमधून समोर आली. अजय बोस यांनी १ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी २०२४ रोजीपर्यत १४ दिवसांचे मोटरमनच्या कामाचे तास आणि ओव्हर टाईमची माहिती मध्य रेल्वेकडे मागितली होती. मात्र, रेल्वेकडे ती माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली नाहीत.
मध्य रेल्वेवर लोकलच्या एकूण १३४ गाड्या असून दिवसाला लोकलच्या १८१० फेर्या होतात. या माध्यमातून लाखो प्रवाशी दररोज मध्य रेल्वेवर प्रवास करतात. या गाड्या चालविण्याकरता १०७६ मोटरमनची गरज आहे. परंतु सद्यपरिस्थितीत ७६३ मोटरमन कार्यरत आहेत. त्यामुळे मोटारमनवर अतिरिक्त कामाचा बोजा पडत आहे. अतिरिक्त कामाचा ताणामुळे मोटरमॅनकडून सिंगल पासिंगची घटना घडत आहे. काही दिवसापूर्वी मुंबई विभागातील एका मोटरमॅनने काही कालवधीतच प्रगती एक्सप्रेससमोर उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली होती.
-
मुंबई विभागात सुमारे दोन हजार सिग्नल आहेत. सिग्नलच्या खांबामध्ये दोष आणि खांब एकाच रांगेत नसल्याने दृश्यमानतेवर परिणाम होतो. रेल्वेच्या नियमांनुसार रुळांच्या डाव्या बाजूला सिग्नल लावणे बंधनकारक आहे. परंतु जागेच्या कमतरतेमुळे सुमारे ३७५ सिग्नल रुळाच्या उजव्या बाजूला आहेत.
मोटरमनच्या रिक्त पदामुळे मोटरमनवर कामाचा अतिरिक्त ताण येत आहे. मोटरमनला ओव्हर टाइम करावे लागते. याकरिता रेल्वेला मोटरमनला ओटी शुल्क द्यावे लागत आहे. कार्यरत मोटरमनचा भार कमी करण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेने तात्काळ मोटरमनचे पद भरावेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.