Railway News: मध्य रेल्वेने गेल्या दहा महिन्यात तब्बल इतक्या मुलांची केली सुटका!

Operation Nanhe Farishte : RPF has been assisted by NGOs like Childline for this campaign| या मोहिमेसाठी आरपीएफला चाइल्डलाइन सारख्या स्वयंसेवी संस्थेच्या मदत झाली आहे.
Railway News: मध्य रेल्वेने गेल्या दहा महिन्यात तब्बल इतक्या मुलांची केली सुटका!
Updated on

मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाने रेल्वे पोलीस आणि इतर फ्रंटलाइन रेल्वेच्या समन्वयाने ऑपरेशन नन्हें फरिश्ते अंतर्गत एप्रिल २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत एकूण ९५८ मुलांची सुटका केली आहे.

यामध्ये ६५५ मुले आणि ३०३ मुलींचा समावेश आहे. या मोहिमेसाठी आरपीएफला चाइल्डलाइन सारख्या स्वयंसेवी संस्थेच्या मदत झाली आहे.

Railway News: मध्य रेल्वेने गेल्या दहा महिन्यात तब्बल इतक्या मुलांची केली सुटका!
Railway News: पश्चिम रेल्वेच्या दक्षता पथकाने बनावट भरतीचे रॅकेट केले उद्ध्वस्त!

काही भांडणामुळे किंवा काही कौटुंबिक समस्यांमुळे अथवा उच्च चांगल्या जीवन पध्दती किंवा शहराचे ग्लॅमर इत्यादींच्या शोधात आपल्या कुटुंबियांना न सांगता रेल्वे स्थानकावर येणारी मुले प्रशिक्षित रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) जवानांच्या निदर्शनास येत असतात.

हे प्रशिक्षित आरपीएफ कर्मचारी मुलांशी संपर्क साधतात, त्यांच्या समस्या समजून घेतात आणि त्यांना त्यांच्या पालकांशी पुन्हा एकत्र येण्यासाठी सल्ला देतात. रेल्वेच्या या सेवेबद्दल अनेक पालक त्यांचे मनापासून आभार आणि कृतज्ञता व्यक्त करतात. मध्य रेल्वेच्या आरपीएफने जानेवारी २०२४ मध्ये ३५ मुले आणि २१ मुलींसह ५६ मुलांची सुटका केली आहे. त्यापैकी एकट्या मुंबई विभागात २७ मुलांची सुटका करण्यात आली आहे.

Railway News: मध्य रेल्वेने गेल्या दहा महिन्यात तब्बल इतक्या मुलांची केली सुटका!
Jalgaon Railway News: भुसावळ रेल्वेने जानेवारीत मिळविला 131 कोटींचा महसूल

कोणत्या भागात किती मुले घरी परतली -

- मुंबई विभाग- २८९ मुले (१७५ मुले आणि ११४ मुली).

- भुसावळ विभाग -२७० मुले (१६९ मुले आणि १०१ मुली).

- पुणे विभाग- २०६ मुले (१९८ मुले आणि ८ मुली).

-नागपूर विभाग १३२ मुले (७६ मुले आणि ५६ मुली).

- सोलापूर विभाग ६१ मुले (३७ मुले आणि २४ मुली).

Railway News: मध्य रेल्वेने गेल्या दहा महिन्यात तब्बल इतक्या मुलांची केली सुटका!
Railway News: 'द्रोणागिरी' स्थानका ऐवजी 'बोकडविरा' नावासाठी ग्रामस्थांचा आग्रह

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()