मुंबई लोहमार्ग पोलिसांचे अधिकृत ट्विटर खाते 12 ऑक्टोंबर 2022 रोजी हॅक करण्यात आले.
मुंबई - मुंबई लोहमार्ग पोलिसांचे अधिकृत ट्विटर खाते 12 ऑक्टोंबर 2022 रोजी हॅक करण्यात आले आहे. मात्र, तब्बल 16 दिवसांनी आपले ट्विटर खाते हॅक झाल्याचे पोलिसांचा लक्षात आले आहे. त्यामुळे लोहमार्ग पोलिसांमध्ये खळबळ उडाली असून ट्विटर खाते पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.
निरनिराळ्या समस्या सोडविण्यासाठी आणि आपली अधिकृत भूमिका मांडण्यासाठी अनेक खासगी कंपन्या तसेच सरकारी प्रशासन सोशल मीडियाचा आधार घेत आहे. ट्विटर हे देखील सोशल मीडियावरील एक प्रभावी माध्यम असून भारतीय रेल्वे आपल्या प्रवाशांना तक्रारीं नोंदविण्यासाठी आणि समस्या सोडविण्यासाठी मोठ्या प्रमाणात ट्विटरचा वापर होत आहे. मुंबई लोहमार्ग पोलिसांनी सुद्धा प्रवाशांच्या प्रश्न व तक्रारी आणि पोलिसांचा सुचनेसाठी फेब्रुवारी 2018 ला @grpmumbai हे ट्विटर खाते सुरु केले होते. आज या ट्विटर हँडलचे जवळ चार हजार 518 फॉलोअर्स आहे. मात्र गेल्या काही दिवसापासून या ट्विटर खात्यावर विदेशी कंपनीच्या जाहिराती आणि अन्य मेसेज ट्विट होत असल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र याची कल्पना मुंबई लोहमार्ग पोलिसांना का आली नाही? असा प्रश्न रेल्वे प्रवाशांना पडला होता. मात्र तब्बल 16 दिवसानंतर ट्विटर खाते हॅक झाल्याची माहिती मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त कार्यलयाकडून दिली गेली. हे अत्यंत दुर्देवी असून प्रवाशांनी लोहमार्ग पोलिसांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.
नागरिकांना आवाहन -
@grpmumbai हे खाते 'हॅक' झाल्याचे आमच्या लक्षात आले आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत कृपया या खात्यावरील कुठल्याही माहितीकडे लक्ष देऊ नका. खात्याचा ताबा परत मिळविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.तोपर्यंत आपण आपले प्रश्न व तक्रारी @cpgrpmumbai अथवा '१५१२' वर कळवू शकता. तसेच अधिकृत जीआरपीच्या ट्विटर हँडलवरून जे काही नवीन ट्वीट केले जातील त्यावर विश्वास ठेवू नका,असे आवाहन स्वतः लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी नागरिकांना केले आहे.
प्रतिक्रिया -
मुंबई लोहमार्ग पोलिसांनी ट्विटर खाते प्रवाशांच्या सुविधेसाठी सुरू केले आहे; मात्र, लोहमार्ग पोलिसांकडे स्वताचा सायबर सेल नसल्याने ट्विटर खाते हॅक झाले आहे. मुंबईच्या सायबर सेल सोबत मुंबई लोहमार्ग पोलिसांनी ट्विटर खाते कनेक्ट करणे आवश्यक आहे. जेणेकरून हॅकर्सपासून ट्विटर खाते सुरक्षित राहील.
- समीर झवेरी, सामाजिक कार्यकर्ते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.