Railway News: निवडणूक फंडावर रेल्वे पोलिसांचा वॉच; प्रत्येक पार्सल बोगीची होणार कसून तपासणी

सीएसएमटी लोहमार्ग पोलिसांनी पंचासमक्ष सदरचे पार्सल उघडून पाहिले असता त्यामध्ये एकूण ४० लाख रूपये रोख रक्कम मिळून आली|CSMT Lohmarg Police opened the said parcel before the Panchayat and found a total amount of Rs 40 lakh in cash
Railway News: निवडणूक फंडावर रेल्वे पोलिसांचा वॉच; प्रत्येक पार्सल बोगीची होणार कसून तपासणी
Updated on

Mumbai Railway News: नागपूर-मुंबई दुरातों एक्सप्रेसच्या पार्सल बोगीत ६० लाख रुपयांची रोकड सापडल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. आरपीएफ पोलिसांच्या तपासणीनंतर ही घटना समोर आली आहे. तात्काळ लोहमार्ग पोलिसांनी रक्कम जप्त केली आहे. या प्रकरणाचा तपास आयकर विभागाकडे सोपवण्यात आले.

मात्र,या घटनेनंतर रेल्वे सुरक्षा दलाने मुंबई ते नागपूर आणि इतर मार्गावर धावणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या पार्सल बोगीची तपासणी वाढविली असल्याची माहिती आरपीएफ पोलिसांनी सकाळला दिली आहे.(Increased inspection of parcel bogies)

Railway News: निवडणूक फंडावर रेल्वे पोलिसांचा वॉच; प्रत्येक पार्सल बोगीची होणार कसून तपासणी
Indian Railway : झुक झुक आगीनगाडी ते ‘वंदे भारत’ भारी, प्रवासी रेल्वेला १७१ वर्षे पूर्ण

रेल्वे सुरक्षा दलाचे पथक(A team of Railway Security Force) सीएसएमटी प्लॅटफॉर्म क्रमांक १७ वर घातपाताच्या अनुषंगाने मेल एक्सप्रेस गाडयांनी येणाऱ्या पार्सलची तपासणी करीत असताना ट्रेन क्रमांक १२२९० नागपूर- सीएसएमटी दुरांतो एक्सप्रेस या गाडीतून आलेले पार्सल चेक करीत असताना त्यांना पार्सलमध्ये रोख रक्कम असल्याचे निदर्शनास आले.

त्यांनी सदर सर्व पार्सल ताब्यात घेवून रेल्वे सुरक्षा बलाचे कार्यालयात (Offices of Railway Security Force)गेले व सदरची माहिती सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाण्यात(Railway Police Station mumbai ) दिली. त्यानंतर सीएसएमटी लोहमार्ग पोलिसांनी पंचासमक्ष सदरचे पार्सल उघडून पाहिले असता त्यामध्ये एकूण ४० लाख रूपये रोख रक्कम मिळून आली.

Railway News: निवडणूक फंडावर रेल्वे पोलिसांचा वॉच; प्रत्येक पार्सल बोगीची होणार कसून तपासणी
Railway News: पश्चिम रेल्वेवर २२ अनारक्षित विशेष गाड्या; प्रवाशाना मिळणार दिलासा

सदर कार्यवाहो दरम्यान आयकर विभागाचे अधिकारी उपस्थिती होते. पार्सल चेक करीत असताना एक पार्सलमध्ये आनखी २० लाख रोख रक्कम मिळून आलेली असे ६० लाख रुपयांची रोख रक्कम पंचनाम्या अंतर्गत जप्त करण्यात आलेली असून पुढील कार्यवाहीसाठी आयकर विभाग (income tax department)यांचेकडे सुपूर्द करण्यात आल्याची माहिती सीएसएमटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजय तायडे यांनी दिली आहे.

पोलिसांचा तपास सुरु -

६० लाख रुपये कोणी कोणाकडे पाठवले याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. रेल्वेच्या सामानाला पार्सल कोड दिला जातो. त्यानुसार पोलीस पार्सल कोडची पडताळणी करत असून नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसमध्ये पैसे कोणी ठेवले होते, याचा तपास सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या देशभरात आचारसंहिता लागू आहे. या कालावधीत अतिरिक्त रोकड घेऊन जाणे शक्य नसतानाही एवढी रोकड कोणी आणि कोणाकडे पाठवली याचा तपास पोलीस करत आहेत.

Railway News: निवडणूक फंडावर रेल्वे पोलिसांचा वॉच; प्रत्येक पार्सल बोगीची होणार कसून तपासणी
Railway News: ४३४ रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना मिळणार शुद्ध पाणी; मंत्रालयाच्या सर्व विभागांना सूचना

पार्सलची तपासणी वाढविणार -

निवडणूक काळात कोणतीही व्यक्ती ५० हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम घेऊन जाऊ शकत नाही. पण तरीही अनेक लोक आवश्यकतेपेक्षा जास्त रोकड घेऊन जात आहे. विशेष म्हणेज आरपीएफ पोलीस स्फोटक वस्तू पार्सल मार्फत घेऊन जाऊ नयेत म्हणून सरप्राईज तपासणी मोहिम घेतात.

मात्र,आता या घटनेनंतर रेल्वे सुरक्षा दलाकडून मेल- एक्सप्रेस गाडयांमधील पार्सल बोगीची तपासणी वाढविणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ऋषी कुमार शुक्ला यांनी दिली आहे.

Railway News: निवडणूक फंडावर रेल्वे पोलिसांचा वॉच; प्रत्येक पार्सल बोगीची होणार कसून तपासणी
Railway News: भाडे व्यतिरिक्त महसूल कमाविण्यात मध्य रेल्वे आघाडीवर; कली इतक्या कोटींची कमाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.