Railway: मध्य रेल्वेच्या शून्य भंगार मोहिमेअंतर्गत गेल्या वर्षभरात भंगार विक्रीतून ३०० कोटीपेक्षा जास्त कमाई केली आहे. विशेष म्हणजे मध्य रेल्वेने २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी रेल्वे बोर्डाचे भंगार विक्रीचे लक्ष्य पार करणारी पहिली क्षेत्रिय रेल्वे होण्याचा टप्पा गाठला आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार,वापरात नसलेले रेल्वे रूळ प्रत्येक डेपोत जमा करून भंगारात देण्याचे नियोजन केले. यासह इतर ठिकाणांचे भंगार उचलेले आहे. यामध्ये लोह, स्टील, अॅल्युमिनियम, पितळ, तांबे व इतर धातूच्या भंगाराची विक्री केली आहे.
यासह मोडीत काढलेले रेल्वेचे डबे, वाघिणी, इंजिने, जुने डबे, माल डबे, चाके यांची विक्री केली आहे. यामध्ये आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी ३०० कोटींचे भंगार विक्रीचे उद्दिष्ट ओलांडून ३००.४३ कोटी मिळवले आहे. एप्रिल ते डिसेंबर २०२३ या कालावधीतील विक्रीच्या उद्दिष्टापेक्षा ३२.२३ टक्के वाढ झाली आहे जी सर्व क्षेत्रिय रेल्वेंमध्ये सर्वाधिक आहे.
कोणत्या विभागाची किती कमाई (कोटीमध्ये)
भुसावळ विभाग - ५९.१४ कोटी
माटुंगा डेपो - ४७.४० कोटी
मुंबई विभाग - ४२.११ कोटी
पुणे विभाग - ३२.५१ कोटी
भुसावळ इलेक्ट्रिक लोको शेड डेपो - २७.२३ कोटी
सोलापूर विभाग - २६.७३ कोटी
नागपूर विभाग - २४.९२ कोटी
इतर ठिकाणी - ४०.३९ कोटी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.