मुंबई: मध्य रेल्वेच्या रेल्वे संरक्षण दलाने (आरपीएफ) रेल्वे आरक्षणाच्या तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्याविरुद्ध मोहिमेस तीव्र केले आहे. लॉकडाऊन कालावधीत आणि त्यानंतर अनलॉक कालावधीत रेल्वेने विशेष गाड्या सुरू केल्या आहे. यामध्ये वैयक्तिक ओळखपत्र वापरुन आरक्षण करणे आणि आरक्षित जागा बळकावण्याचा प्रकार सुरू असल्याच्या ई-तिकिटांच्या तक्रारीवरून नोव्हेंबरपर्यंत 174 गुन्हे दाखल केले असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
मध्य रेल्वेच्या आरपीएफ पथकाने तिकीट काळाबाजार करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहे. त्यासाठी सायबर सेलकडून मिळालेल्या आकडेवारीच्या आधारे आणि गुप्त माहितीच्या आधारे तिकीट काळाबाजार करणाऱ्या खासगी एजन्सीच्या दुकानांवर छापेमारी सुद्धा सुरू केली आहे. मुंबईसह संपूर्ण पाचही विभागात आरपीएफ पथकाची अशी छापेमारी सुरू असून, रेल्वे कायद्याच्या कलम 143 अंतर्गत दलालांवर गुन्हे दाखल केले जात आहे.
त्यासोबतच प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी लांबपल्ल्यावर आरपीएफ पथकाची सुद्धा नेमणूक केली जाते. यामध्ये आरपीएफ महिला प्रवाशांना विशेषतः एकट्या प्रवास करताना सुरक्षित आणि आरामदायक प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी मध्य रेल्वेच्या आरपीएफ टीमनं नुकतीच मेरी सहेली उपक्रमही सुरू केले आहे. याअंतर्गत आरपीएफचे पथक दैनिक आणि साप्ताहिक विशेष गाड्यांसह सरासरी 25 गाड्यांमधून एस्कॉर्टींग केली जात असल्याचे मध्य रेल्वेने सांगितले आहे.
------------------------------
(संपादन- पूजा विचारे)
Railway ticket scam RPF squad action 174 cases filed till November
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.