Railway: एक्सप्रेसला इंजिन जोडताना रेल्वे कर्मचाऱ्यांचा दुर्देवी मृत्यू

Mumbai : कपलिंग सरळ करत दोन कपलिंगच्यामध्ये सूरज अडकून गँभीर जखमी झाले
Railway: एक्सप्रेसला इंजिन जोडताना रेल्वे कर्मचाऱ्यांचा दुर्देवी मृत्यू
Railwaysakal
Updated on

Mumbai Latest Update: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधील रेल्वे यार्डमध्ये कोणार्क एक्सप्रेसला इंजिन जोडत असतांना दोन्ही डब्यामध्ये फसून रेल्वे कर्मचाऱ्यांना मृत्यू झाला आहे. सूरज सेठ असे मृत कर्मचाऱ्यांचे नाव आहे. मध्य रेल्वेमध्ये पॉईटमॅन या पदावर कार्यरत होता.

Railway: एक्सप्रेसला इंजिन जोडताना रेल्वे कर्मचाऱ्यांचा दुर्देवी मृत्यू
Mumbai Rain Update: सलग तिसऱ्या दिवशी मुंबईकरांचे हाल, पावसामुळे लोकल विलंबाने !

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळावारी दुपारी ३ वाजताच सुमारास सीएसएमटी यार्डमध्ये कोणार्क एक्सप्रेसला इंजिन जोड होते. कपलिंग व्यवस्थित लागले नव्हती. त्यामुळे कपलिंगला सरळ करण्यासाठी पॉइंटसमन सूरज सेठ दोन डब्यामध्ये गेले. त्यानंतर कपलिंग सरळ करत दोन कपलिंगच्यामध्ये सूरज अडकून गँभीर जखमी झाले. त्यात त्याच्या दुर्देवी मृत्यू झाला आहे.

सामान्यपणे एक्सप्रेसला इंजिन जोडणी होत असताना सहाय्यक लोकोपायलट आणि शंटिंग सुपरवायझर यांना प्रत्यक्ष जागेवर उपस्थित राहणे बंधनकारक आहे. मात्र यावेळी हे दोघे ही उपस्थित नसल्याने हा अपघात झाला असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे कपलींगच्या आव्हानात्मक कामाची जबाबदारी सर्रासपणे कर्मचाऱ्यांवर सोपवत अनुपस्थित राहिलेल्या सुपरवायझरवर मध्य रेल्वे प्रशासन कारवाई करणार का? असा सवाल रेल्वे कर्मचारी संघटनांकडून करण्यात येत आहे.

Railway: एक्सप्रेसला इंजिन जोडताना रेल्वे कर्मचाऱ्यांचा दुर्देवी मृत्यू
Mumbai: खवळलेल्या समुद्रात उडी घेत हिरे व्यापाऱ्यानं संपवलं जीवन; काय घडलं नेमकं? जाणून घ्या

मात्र,रेल्वे अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहे. तसेच मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला तत्काळ आर्थिक मदत दिली जाईल यासोबत त्याच्या कुटुंबातील सदस्याला रेल्वे रुजू करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

Railway: एक्सप्रेसला इंजिन जोडताना रेल्वे कर्मचाऱ्यांचा दुर्देवी मृत्यू
Mumbai Rain Update: दोन तासांपासून डाऊन जलद मार्गावरील लोकल - एक्सप्रेस खोळंबल्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.