महिला डब्यांमधून पुरूष फेरीवाल्यांचा प्रवास; 29 हजाराहून अधिक प्रवाशांवर कारवाई

railway police
railway policesakal media
Updated on

मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील लोकल (Railway train), एक्स्प्रेसमधील महिला डब्यांत पुरूष प्रवाशांचा प्रवास (male commuters) सुरू होतो. महिला डब्यात पुरूष फेरीवाले, तर काही पुरूष प्रवासी घुसखोरीकडून (hawkers journey) डब्यातून प्रवास करतात. मागील दोन वर्षात मध्य आणि पश्चिम रेल्वेवरून एकूण 29 हजार 522 जणांवर कारवाई (railway police action) करण्यात आली असून त्यांच्याकडून 71 लाखांहून अधिक दंड वसूली केली आहे.

railway police
खालापूरात पत्नीच्या खून प्रकरणी पतीला अटक

मध्य आणि पश्चिम रेल्वेवरून धावणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांना महिलांचा राखीव डबा जोडलेला असतो. मात्र, या डब्यांतून सर्रासपणे पुरूष प्रवाशांकडून प्रवास केला जातो. तर, बारा डब्यांच्या लोकलमध्ये एकूण तीन डबे महिलांसाठी राखीव असतात. मात्र, या डब्यातून पुरूष फेरीवाले सामग्री विक्रीसाठी प्रवास करतात. त्यामुळे महिला प्रवाशांमध्ये प्रवास करताना भितीचे वातावरण निर्माण होते. मात्र, अशा घुसखोरी करणाऱ्या पुरूष प्रवाशांना रेल्वे पोलीस किंवा आरपीएफद्वारे पकडण्याची कारवाई सुरू आहे. 2019 ते सप्टेंबर 2021 या कालावधीत एकूण 29 हजार 522 जणांना पकडण्यात आले आहे. तर, त्यांच्याकडून 71 लाखांहून अधिक दंड वसूली केली आहे.

मध्य रेल्वेवरून 2019 साली 4 हजार 482, 2020 साली 1 हजार 223 आणि सप्टेंबर 2021 पर्यंत 272 पुरूष प्रवाशांवर कारवाई केली आहे. यातून 18 लाख 26 हजारांची दंड वसूली केली आहे. तर, पश्चिम रेल्वेवरून 2019 साली 14 हजार 306, 2020 साली 3 हजार 922 आणि सप्टेंबर 2021 पर्यंत 5 हजार 317 पुरूष प्रवाशांवर कारवाई केली आहे. यातून 52 लाख 77 हजारांचा दंड वसूल करण्यात आला.

railway police
१० दुचाकी चोरी करणाऱ्या आरोपीस भांडुप पोलिसांनी केली अटक

"लोकलच्या महिला डब्यात पुरूष फेरीवाले बिनधास्तपणे शिरून साम्रगीची विक्री करतात. यात अनेकवेळा तीन ते चार पुरूष विक्रेते एकत्र येतात. त्यामुळे एकट्या महिला प्रवाशामध्ये भितीचे वातावरण असते. अनेक फेरीवाले मास्क वापरत नाही. तर, अनेक फेरीवाले फॉर्मल घालून आणि पोटावर बॅग ठेवून डब्यात शिरकाव करतात. त्यानंतर बॅगेतून विक्रीची सामग्री करतात. सुरक्षा विभागाने अशा फेरीवाल्यांना हेरून कारवाई करणे आवश्यक आहे."

- काजल घेगडमल, प्रवासी

मागील काही दिवसापूर्वी रेल्वे परिसरात 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याची घटना घडली होती. त्यानंतर प्रशासन जागे होऊन याविषयावर वारंवार बैठका घेऊन निद्रिस्त असलेल्या योजना पुन्हा सुरू करत आहे. दरम्यान, मुंबई विभागात सर्वाधिक महिला कर्मचाऱ्यांची संख्या आहे. एकूण फौजफाट्याच्या 16 टक्के महिला कर्मचाऱ्यांचे प्रमाण आहे. मेरी सहेली, गर्ल्स पाॅवर यामध्ये या महिला कर्मचारी कार्यरत आहेत. यासह महिला प्रवाशांचे आणि सुरक्षा विभागाचे व्हाॅट्सअप ग्रुपमध्ये महिला प्रवाशांची संख्या वाढविण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे विभागीय वरिष्ठ सुरक्षा आयुक्त जितेंद्र श्रीवास्तव यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.