Railway: ख्रिसमस अन् नववर्षानिमित्त गोव्याला जायचंय? रेल्वे सोडणार १४ विशेष गाड्या

Railway: रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी स्थानकांवर थांबणार आहे.
special train
special trainsakal
Updated on

Railway: नाताळ आणि नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने पनवेल ते मडगाव दरम्यान १४ विशेष गाड्या चालविण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे

रेल्वे नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात जाणाऱ्या पर्यटक आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

special train
Dadar Railway Platform : प्रवाशांना गोधळातुन मिळाली सुटका! दादर स्थानकातील प्लॅटफॉर्म सलग

मध्य रेल्वे दिलेल्या माहितीनुसार ट्रेन क्रमांक

०१४२७/०१४२८ पनवेल- मडगाव-पनवेल विशेष १२ फेऱ्या असणार आहे. ट्रेन क्रमांक

०१४२७ पनवेल-मडगाव एक्सप्रेस

२२ डिसेंबर ते दि. ३१डिसेंबर २०२३ पर्यंत दर शुक्रवार, शनिवार आणि रविवार रोजी रात्री ९.१० वाजता विशेष पनवेल येथून सुटेल आणि मडगाव जंक्शन येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ६.५० वाजता पोहोचेल.

तर ट्रेन क्रमांक ०१४२८ मडगाव - पनवेल स्पेशल एक्सप्रेस २२ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२३ दर शुक्रवारी, शनिवार आणि रविवारी सकाळी ८ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ८.१५ वाजता पनवेल येथे पोहोचेल. या दोन्ही गाड्या रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी स्थानकांवर थांबणार आहे.

special train
Railway: रेल्वेत सिगरेटचे सेवन करत असाल तर सावधान! तब्बल इतक्या प्रवाशांवर कारवाई

ट्रेन क्रमांक ०१४३० मडगाव - पनवेल नववर्ष विशेष गाडी मडगाव जं. येथून १ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता (एक फेरी) सुटेल आणि पनवेल येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ७.२० वाजता पोहोचेल. ट्रेन क्रमांक ०१४२९ पनवेल – मडगाव जं. नवीन वर्ष विशेष एक्सप्रेस २ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ८.२० वाजता सुटेल (एक फेरी) आणि मडगाव जंक्शन येथे त्याच दिवशी रात्री ९.३० वाजता पोहोचेल. रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी स्थानकांवर थांबणार आहे.

या सर्व विशेष गाड्यांचे आरक्षण भारतीय रेल्वेच्या सर्व संगणक आरक्षण केंद्रावर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू झालेले आहेत.

special train
Railway: मध्य रेल्वेने कसली कंबर; १००हुन अधिक तिकीट दलालांना केली अटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.