रेल्वेची आणखी मोठी घोषणा, रेल्वे पुढच्या १० दिवसात सुरु करणार 'ही' सेवा...

train
train
Updated on

मुंबई: गेल्या काही महिन्यांपासून देशात लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे कामानिमित्त किंवा रोजगारासाठी इतर राज्यात राहणारे मजूर, शिक्षणासाठी राहणारे विद्यार्थी आणि पर्यटक अडकले आहेत. त्यांच्यावर गावी पायी चालत जाण्याची वेळ आली आहे. यात काही निष्पाप लोकांचा मृत्यूही झाला आहे. मात्र आता या स्थलांतरितांचे कष्ट कमी करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून आणखी एक महत्वाचा निणर्य घेण्यात आला आहे. 

रेल्वे मंत्रालयाकडून १ मेपासून 'श्रमिक ट्रेन' सुरु करण्यात आल्या होत्या. या श्रमिक ट्रेन्सच्या माध्यमातून लाखो मजूर परप्रांतीय आपल्या गावी पोहोचू शकले होते. मात्र अजूनही लाखो मजूर इतर राज्यांमध्ये अडकले आहेत. सद्य परिस्थितीत सुरु असलेल्या रेल्वेगाड्या काही ठराविक शहरातच जात आहेत. त्यामुळे इतर ठिकाणी राहणाऱ्या मजुरांचे हाल होत आहेत. 

मात्र आता पुढच्या १० दिवसात तब्बल २६०० रेल्वेगाड्या सुरु करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाकडून घेण्यात आला नाही. त्यामुळे तब्बल ३६ लाखांच्या वर मजुरांची घरी जाण्याची सोय होऊ शकणार आहे. विशेष म्हणजे या रेल्वेगाड्या लवकरत लवकर सुरु करून श्रमिकांना त्यांच्या गावी पोहोचवण्याचा निर्णय रेल्वेकडून घेण्यात आला आहे. 

पुढच्या १० दिवसात २६०० 'श्रमिक ट्रेन' सुरु करण्यात येणार आहेत. देशभरतल्या राज्यांच्या मागणीनुसार या रेल्वेगाड्या सुरु केल्या जाणार आहेत. मात्र या रेल्वेगाड्या पॉईंट-टू-पॉईंट असणार आहेत म्हणजेच संपूर्ण प्रवासात कुठलीही रेल्वेगाडी कोणत्याही स्टेशनवर थांबणार नाहीये. 

रेल्वेनं या श्रमिकांच्या सुरळीत आणि सुरक्षित प्रवासासाठी त्या त्या राज्यात आणि जिल्ह्यांमध्ये नोडल अधिकारी नेमले आहेत. हे अधिकारीच या सर्व प्रक्रियेत श्रमिकांची मदत करणार आहेत. 

या व्यतिरिक्त रेल्वे १ जूनपासून तब्बल २०० ट्रेन सुरु करणार आहे यात १५ स्पेशल रेल्वेगाड्यांचाही समावेश आहे.      

railway will start 2600 trains in next 10 days read full story 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.