Mumbai : पूरग्रस्त प्रवाशांसाठी रेल्वेचे 'पूर बचाव पथक' सज्ज; ५ बचाव बोटी असणार तैनात!

Mumbai News
Mumbai News
Updated on

मुंबई : दरवर्षी पावसाळ्यात रेल्वेला अतिवृष्टीच्या सामना करावा लागतो. अनेक रेल्वे गाड्या पुरात अडकलेल्याने पूरग्रस्त रेल्वे प्रवाशांच्या मदतीसाठी बोटी नसल्यामुळे इतर यंत्रणांवर अवलंबून राहावे लागले होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून मध्य रेल्वेने बोटी घेतल्या आहे.

Mumbai News
Pune News : महापालिकेच्या शाळेतील शिक्षकांच्या 500 जागा रिक्त; 'यामुळे' प्रशासनही हतबल

यंदा प्रवाशांचा सुटकेसाठी रेल्वेचे 'पूर बचाव पथक' सज्ज झाले आहे. या पथकात ५ बचाव बोटींचा समावेश करण्यात आला आहे. मध्य रेल्वेने दिलेल्या महिनीनुसार, 'पूर बचाव पथकामध्ये १४ आरपीएफ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पूर बचाव पथकांतील जवानी पुण्यातील राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) कडून प्रशिक्षण घेतले आहे, त्यांना पूरप्रवण भागात तैनात केले जाईल. त्यांना बचाव कार्यात मदत करण्यासाठी पाच बचाव बोटी असणार आहे.

मुंबई विभागाने अलीकडेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, माटुंगा, कुर्ला, ठाणे आणि बदलापूर या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर या पाच बोटी तैनात असणार आहे. . या पथकात लाइफ जॅकेटचा देखील समावेश आला आहे. याशिवाय एका बोटीत पाच प्रवासी वाहुन नेण्याची क्षमता आहे.

रेल्वेच्या प्रत्येक विभागात एक बोट ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे पूरपरिस्थितीत जलद आणि कार्यक्षम बचाव कार्य करताना या बोटी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. यंदाचा पावसाळ्यात मध्य रेल्वेवरील मुख्य आणि हार्बर रेल्वेवरील संवेदनशील ठिकाणी या 'पूर बचाव पथक' तैनात करण्यात येणार आहे. याशिवाय लोकलमधून प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाकडून १०० हुन अधिक लहान शिड्या खरेदी करण्यात येणार आहेत.

Mumbai News
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना झेड ऐवजी वाय सुरक्षा! संपूर्ण ठाकरे कुटुंबियांची सुरक्षा केली कमी

तत्पर प्रतिसाद

रेल्वेचे 'पूर बचाव पथक संबंधित पोस्टमधील इतर कर्मचारी सदस्यांसह, जेव्हा आवश्यक असेल किंवा इतर विभागांद्वारे सूचित केले जाईल तेव्हा पूरग्रस्त भागात त्वरित अहवाल देईल. बाधित प्रवाशांना वेळेवर मदत देण्यासाठी त्यांची उपस्थिती महत्त्वपूर्ण ठरेल.

मॉक ड्रिल- 'पूर बचाव पथकाच्या तयारीचे मूल्यांकन करण्यासाठी, १० मार्च २०२३ रोजी, पलसधारी, कर्जत येथील रेल्वे धरणावर मॉक ड्रिल घेण्यात आली. या सरावात पाचही बोटींचा समावेश होता, ज्यामुळे आमच्या प्रशिक्षित कर्मचाऱ्यांना बचाव कार्याचा सराव करता येतो आणि त्यांची तयारी वाढू शकते.

आपत्ती व्यवस्थापन योजना

आरपीएफ मुंबई विभागाने मान्सूनच्या तयारीचा एक भाग म्हणून गर्दी नियंत्रण आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी एक व्यापक योजना तयार केली आहे. या योजनेत मनुष्यबळ वाढवणे, नियंत्रण कक्ष वाढवणे आणि पोलीस, जीआरपी, रुग्णालये, अग्निशमन दल, महानगरपालिका प्राधिकरण, एनडीआरएफ आणि इतर एजन्सीसाठी आवश्यक संपर्क क्रमांक समाविष्ट आहेत. त्यात प्रभावी प्रतिसादासाठी पूर-प्रवण क्षेत्रे आणि भरती-ओहोटीच्या तारखा देखील समाविष्ट आहेत.

ड्रोन कॅमेरा

आपत्कालीन परिस्थितीत मदत कार्यांचे निरीक्षण वाढविण्यासाठी, दोन ड्रोन कॅमेरे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. शिवाय, चार आरपीएफ जवानांनी हे ड्रोन प्रभावीपणे चालवण्यासाठी विशेष प्रशिक्षण घेतले आहे.

साहित्य

७५ लाउडहेलर

१०० रेनकोट

पुरेशा प्रमाणात दोरी आणि चमकदार टेप

२२५ चमकदार जॅकेट

९० शिडी

३१८ नग ५-वॅट वॉकी-टॉकीज

०३ नग २५-वॅट VHF संच

२५० नग एलईडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.