आदिवासी पाड्यात कोसळले घर; 5 जण जखमी, रस्ता नसल्याने जखमींना झोळीतून न्यावे लागले दवाखान्यात

शहापूर तालुक्यात (Shahapur) गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झालेय.
House Collapsed in Tribal Area Shahapur
House Collapsed in Tribal Area Shahapuresakal
Updated on
Summary

सापटेपाडापासून मुख्य रस्त्या दोन किमी अंतर लांब असून या पाड्याला अजूनही मुख्य रस्त्यास जोडण्याकरिता रस्ता उपलब्ध नाही.

खर्डी : शहापूर तालुक्यात (Shahapur) गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झालेय. अनेकांच्या घरात पाणी जाऊन नुकसान झाल्याच्या घटना तालुक्यातील गाव पाड्यात घडत आहेत. तानसा धरणाजवळील अघई येथील एका आदिवासी पाड्यात काल रात्री 9.39 च्या सुमारास घरात कुटुंब चर्चा करत बसले असताना, अचानक त्यांच्या अंगावर घर कोसळून घरातील 5 जण जखमी झाले आहेत.

मात्र, त्या आदिवासी पाड्यातून अघई प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेण्यासाठी जायला रस्ताच नसल्याने रात्रीच्या अंधारात स्थानिक रहिवाशांना चिखल तुडवत 2 किमीपर्यंत एका गंभीर जखमीला झोळीतून नेऊन प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून जखमीवर उपचार केल्यामुळे त्या व्यक्तीचे प्राण वाचले आहेत.

House Collapsed in Tribal Area Shahapur
समृद्धी महामार्गावरील 'या' दोन गावांना जोडणाऱ्या पुलाला भले मोठे भगदाड; भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता!

दोन दिवस सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे शहापूर तालुक्यातील वेहालोंडे अंतर्गत येणाऱ्या सापटेपाडा येथील घर अचानक कोसळल्याने घरात बसलेले त्र्यंबक पाचालकर, लाडक्या पाचालकर, जनी पाचालकर, शांता पाचालकर व विजय पाचालकर हे जखमी झाले आहेत.

सापटेपाडापासून मुख्य रस्त्या दोन किमी अंतर लांब असून या पाड्याला अजूनही मुख्य रस्त्यास जोडण्याकरिता रस्ता उपलब्ध नाही. रस्ता नसल्याने गावातील शेजाऱ्यांनी झोळी करून जखमी व्यक्तींना मुख्य रस्त्यापर्यंतच्या दवाखान्यात नेऊन दाखल केले. सध्या जखमींची प्रकृती ठीक असल्याची माहिती श्रमजिवी संघटनेचे तालुका सचिव प्रकाश खोडका यांनी दिली.

"शहापूर तालुक्यातील 50 टक्के आदिवासी पाडे आजही वन विभागाच्या कायद्यामुळे रस्त्यापासून वंचित असल्याने येथे रात्री काही अपघात किंवा महिलेची प्रसूती करण्यासाठी आजही झोळी करून अंधारात वाट करून न्यावे लागत आहे. यासाठी शासनाने वन विभागाच्या जाचक अटी रद्द करून येथील आदिवासींच्या विकासाच्या वाटा वन विभागाकडून मोकळ्या करून घ्याव्यात, जेणे करून त्यांचे जीवन सुखकर होईल."

-प्रकाश खोडका, सचिव, श्रमजिवी संघटना, शहापूर तालुका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.