पॉर्नोग्राफी प्रकरण: राज कुंद्राच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

"राज कुंद्राला झालेली अटक बेकायदेशीर असून त्यांनी बनवलेल्या कुठल्याही व्हिडिओला अश्लील म्हणता येणार नाही"
Shilpa Raj
Shilpa Raj
Updated on

मुंबई: सध्या तुरुंगात असलेल्या राज कुंद्राने (Raj Kundra) पोलीस कोठडीला आव्हान देत जामिनावर सुटका करण्याची मागणी केली आहे. राज कुंद्राच्या या जामीन याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) सुनावणी होणार आहे. अश्लील व्हिडिओ प्रकरणात राज कुंद्राला अटक झाली असून सायबर गुन्हे पोलीस (cyber crime police) या प्रकरणाचा तपास करत आहेत. मुंबई पोलिसांच्या संपत्ती शाखेने १९ जुलैला राज कुंद्राला अटक केली. अश्लील कंटेट बनवून त्याचे वितरण केल्याच्या आरोपाखाली राज कुंद्राला अटक करण्यात आली. राज कुंद्राच्या वाढवण्यात आलेल्या पोलीस कोठडीची (police custody) मुदत आज संपणार आहे. (Raj Kundra pornography case Bombay High Court to hear Raj Kundras plea challenging police custody and seeking bail dmp82)

राज कुंद्राला झालेली अटक बेकायदेशीर असून त्यांनी बनवलेल्या कुठल्याही व्हिडिओला अश्लील म्हणता येणार नाही, असा दावा कुंद्राचे वकिल सुभाष जाधव यांनी केला होता. पोलिसांनी ४ हजार पानी आरोपपत्र दाखल केले आहे. पण कलम ६७ अ अंतर्गत कुठल्याही व्हिडिओमध्ये बेकायद ठरणारी लैंगिक कृती त्यांना नमूद करता आलेली नाही. राज कुंद्रावर लावण्यात आलेली अन्य कलमे जामीन पात्र आहेत.

Shilpa Raj
मुंबईतील तीनपैकी एक प्रौढ व्यक्तीचा जीवन दर्जा निकृष्ट

राज कुंद्राविरोधात आयपीसीच्या कलम ४२० (फसवणूक), ३४, कलम २९२, २९३ (अश्लील, असभ्य जाहीरात) गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या अश्लील व्हिडिओ प्रकरणातील पैशाच्या व्यवहाराच्या तपासासाठी गुन्हे शाखेने आर्थिक ऑडिटरची नेमणूक केली आहे. राजच्या लॅपटॉप मध्ये सॅम बॉक्स नावाच्या फोल्डरमध्ये 48 जीबी चा डेटा जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या डेटामध्ये हॉटशॉटचे 51 व्हिडिओ होते.

Shilpa Raj
एकमेका सहाय्य करू... रेल्वेच्या मदतीला धावली एसटी; सर्वत्र कौतुक!

याशिवाय पोलिसांना उपलब्ध झालेल्या माहितीवरून WhatsApp चॅटमध्ये राज यांच्याकडे काम करणाऱ्या महिलेला पुन्हा कामावर घेण्याबाबत उमेश कामत यांची विनंती करत आहेत. तसेच कंपनीतील अकाउंटची चर्चाही पोलिसांच्या हाती लागली आहेत त्यात कंपनीतील अकाऊटंट महिला दिवसाचा नफा आणि खर्च याची माहिती राज आणि इतर सहकाऱ्यांना विशलेषन करून सांगायची, असे स्पष्ट झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.