राज ठाकरेंचे 9 अंकाच्या मदतीने नवनिर्माण ! मोर्च्यातही 9 अंकाचा बोलबाला

राज ठाकरेंचे 9 अंकाच्या मदतीने नवनिर्माण ! मोर्च्यातही 9 अंकाचा बोलबाला
Updated on

मुंबई  : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून रविवारी बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात मोर्चाचे आयोजन करण्यात आले. नवी राजकीय भूमिका घेतल्यानंतर मनसे पहिलाच मोर्चा होता. या मोर्च्याचे विशेष म्हणजे 9 तारीख आहे. राज ठाकरे यांचा लकी नंबर 9 मानला जातो. यामुळे मोर्च्यामध्ये ही मनसैनिक 9 अंक असलेला टी शर्ट घालून सहभागी झाले. रविवारी 9 तारीख असल्याने राज ठाकरेंनी आपल्या लकी नंबरच्या दिवशी मोर्चा आयोजित केला असल्याची चर्चा सुरु आहे. 

राज ठाकरे आपली सर्व महत्त्वाची कामं आपल्या लकी अंकानुसार करतात, असं म्हटलं जाते. त्यानुसार आतापर्यंत अनेक कामं राज ठाकरेंनी 9 नंबरनुसार केले. राज ठकारे रविवारी 9 नंबरच्या गाडीत बसूनच मोर्चासाठी रवाना झाले. इतकंच नाही तर मोर्च्यासाठीची तयारीही त्यांनी सकाळी 9 वाजता सुरू केल्याचे समजते.

पूर्वी शिवसेनेत असताना असो किंवा मग मनसेची स्थापना केल्यानंतर असो, राज ठाकरेंचं हे 9 अंकावरील प्रेम वारंवार दिसत राहिलं आहे. आपल्या मुलाच्या लग्नाच्या निमित्तानं देखील राज ठाकरेंनी आपला लकी नंबर जपण्याचा पूरेपूर प्रयत्न केला.

नुकतेच विधानसभा निवडणुकीतही राज ठाकरेंनी आपल्या प्रचाराची सुरुवात 9 तारखेपासून केली होती. पहिल्या सभेच्या मुहूर्तासाठी मनसेने आपला लकी नंबर 9 निवडला होता.

राज ठाकरेंनी आपल्या पक्षाची भूमिका बदल्यानंतर त्यांनी हिंदुत्वाकडे वाटचाल सुरू केली आहे. पक्षाची भूमिका बदलल्यांतर राज यांनी पहिला मोर्चा ही 9 फेब्रुवारी रोजी आयोजित केला.यामुळे रविवारच्या मोर्च्यासाठी देखील मनसैनिकांकडून 9 अंक असलेले भगवे टी शर्ट घालून सहभागी झाले.9 अंक छापलेले बॅनर ही मोठ्या प्रमाणावर दिसले.त्याच बरोबर मोर्च्याची सुरुवात जेथून झाली त्या पारसी जिमखाना ते आझाद मैदाना पर्यंतच्या रस्त्यावर राज ठाकरेंचे मोठे बॅनर लावण्यात आले होते त्यावर ही 9 आकडा हा ठळकपणे लिहिण्यात आला होता.हिंदुत्वाची भूमिका स्वीकारत झेंड्याचा रंग भगवा केल्याने मोर्च्यातील वातावरण ही भगवेमय झाले होते.राज ठाकरे झिंदाबाद,पाकिस्तान मुरदाबाद च्या घोषणांनी परिसर निनादून गेला.9 अंक नवनिर्माण करेल असा विश्वास मन सैनिकांनी व्यक्त केला. 

राज ठाकरेंची 'ही' जय्यत तयारी 

महामोर्चासाठी राज ठाकरे जय्यत तयारी ने घराबाहेर पडले.त्यावेळी त्यांनी पहिल्यांदाच आपल्या दंडावर राजमुद्रा असलेला बॅंड धारण केला .कृष्णकुंज वर आलेल्या कार्यकर्त्यांच्या दंडावर ही त्यांनी स्वता राजमुद्रा असलेला बॅंड बांधला.यानंतर पत्नी शर्मिला,मुलगा अमित आणि सून मिताली ठाकरें सह राज ठाकरे आपल्या9 क्रमांकाच्या गाडीने सिद्धिविनायक मंदिरात गेले.तिथे सहकुटुंब श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन ते सभेस्थानी रवाना झाले. 

मनसेने आपल्या महामोर्चासाठी जय्यत तयारी केली असून यासाठी विशेष प्रकारचे टी-शर्ट आणि टोप्या बनवण्यात आल्या होत्या. मनसेने आपल्या झेंड्याचा रंग भगवा केल्यामुळे टोप्या देखील भगव्या करण्यात आल्या होत्या तर त्यावर शिवमुद्रेच चिन्ह कोरण्यात आलं होतं. त्याचप्रमाणे काळ्या टी-शर्टवर नऊ आकडा व भगव्या रंगाची शिवमुद्रा अशा प्रकारचे टी-शर्ट देखील मनसैनिकांनी मोठ्या प्रमाणात घातले होते.

ग्रामीण परिसरातील जिल्ह्या आणि शहरातील शहर प्रमुख तसेच जिल्हाप्रमुखांना हे टी शर्ट आणि टोप्या मोठ्या प्रमाणात तयार करण्यास सांगण्यात आले होते. या महामोर्चाच्या माध्यमातून एक वेगळ्या प्रकारचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न मनसेने केला. या महामोर्चाच्या माध्यमातून एक वेगळी ओळख आणि एक वेगळी छाप सोडण्याचा प्रयत्न मनसेकडून करण्यात आला. 

raj thackeray and his lucky nine number observed in chale jao rally of azad maidan

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.