सत्ताधारी-विरोधक राजकारणात व्यस्त; मुद्द्यापासून वेगळीकडे लक्ष वळवण्याचं काम सुरू, वरळीत राज ठाकरेंचं शरसंधान

Raj Thackeray: राज ठाकरे यांनी व्हिजन वरळी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी संवाद साधला आहे.
Raj Thackeray
Raj ThackerayESakal
Updated on

बीडीडी चाळ दिसल्यावर माझं बालपण आठवलं. मी लहानपणी बाळासाहेबांच्या सोबत आणि माझ्या वडिलांसोबत यायचो. आज मोठं भाषण करणार नाही. मात्र तुम्ही महाराष्ट्राचे मालक आहात, तुम्ही कसले रडताय? इतर राज्यातील लोक येतात. झोपडपट्टी बांधतात आणि नवीन घर मिळवतात. कारण तुम्ही योग्य वेळी काही करत नाही. बाहेरच्या राज्यातील लोकांची टगेगिरी सुरू झाली की त्यांना हवं ते मिळतं. 2 कुटुंबाला एक पार्किंग हा अजब प्रकार इथे दिसला, असं मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे म्हणाले आहेत.

आज आमदार आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात मनसेकडून व्हिजन वरळी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित होते. राज ठाकरे यांच्या हस्ते व्हिजन वरळी या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यानंतर राज ठाकरे यांनी उपस्थितांसोबत संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील राजकारण, मालवण घटना, तसेच मुंबईत परप्रातींयाचे राहणे या प्रश्नांवर भाष्य केले आहे. तसेच राज्य सरकारची कान उघडणीही केल्याचे दिसून आले आहे.

Raj Thackeray
...नाहीतर हातपाय तोडू, पाकिस्तानी चित्रपट 'द लिजेंड ऑफ मौला जट' विरोधात MNS आक्रमक, थेट धमकीच दिली

राज ठाकरे म्हणाले की, प्रकल्प येण्यापूर्वी तुम्हाला विचारलं जात नाही. तर हे प्रकल्प तुमच्यावर लादले जातात. हे फक्त वरळीच नाही तर महाराष्ट्रात सुरू आहे. आम्ही करू ते तुम्हाला मान्य, अशी आजवरच्या राज्यकर्त्यांची भावना आहे. ऐनवेळी चार तुकडे टाकून तुम्हाला शांत केलं जाणार आहे. तुमचा स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या. विकास योजना होते पण शहर नियोजन होत नाही. आम्ही स्क्वेअर फुटात अडकलोय आणि बिल्डर मलिदा घेऊन जातो, असं म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

राज्यातील शहरांना ओळख उरली नाही. सत्ताधारी-विरोधक राजकारण करत आहेत. मूळ मुद्द्यापासून वेगळीकडे लक्ष वळवण्याचं काम सध्या सुरू आहे. मालवणमध्ये महाराजांचा पुतळा पडला. मी तेव्हाच सांगितलं होतं पुतळा बांधण्यापेक्षा गडकिल्ले चांगले करा. ती खरी संपत्ती आहे, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.