Raj Thackeray : आजच्या राजकारणात मी फीट बसत नाही; राज ठाकरेंनी व्यक्त केली खंत

एका मुलाखतीत बोलताना राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर सडेतोड भाष्य केलं आहे.
raj thackeray
raj thackerayesakal
Updated on

मुंबई : एका मुलाखतीत बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर सडेतोड भाष्य केलं आहे. यावेळी आपण आजच्या राजकारणात मिसफीट आहोत, अशा शब्दांत त्यांनी महाराष्ट्रातील राजकारणावर भाष्य केलं आहे. लेखक अंबरीश मिश्र यांनी त्यांची मुलाखत घेतली. (Raj Thackeray expressed regret about Maharashtra Politics says I dont fit in that)

raj thackeray
Bilkis Bano case: 'त्या' 11 दोषींच्या अडचणी वाढणार! आव्हान याचिकेला सुप्रीम कोर्टाची परवानगी

राज ठाकरे म्हणाले, "मी मागे माझ्या एका मुलाखतीत सांगितलं होतं की, मी अपघातानं राजकारणात आलो. राजकीय वातावरण माझ्या घरात होतो, त्या सगळ्यातून मी राजकीय व्यंगचित्रकार झालो पण आत्ता महाराष्ट्रातलं सर्व राजकारण बघितलं तर मला असं वाटतं की मी या राजकारणासाठी मिसफिट आहे"

raj thackeray
Gudi Padwa 2023: "आमचा पर्सनल अजेंडा..."; डोंबिवलीतील शोभायात्रेत CM शिंदेंनी दिल्या गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

महाराष्ट्राची अशी परिस्थिती मी आजवर पाहिली नाही. ज्या प्रकारे सर्व राजकीय पक्षांची स्थिती झाली आहे. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे सोशल मीडिया आहे. सोशल मीडियामुळं कोणीही व्यक्त व्हायला लागलंय आहे, व्यक्त व्हायला पैसे लावले पाहिजेत. कुठलाही आगा ना पिछा कोणीही काहीही बोलतंय, टीव्हीवरही ते दाखवलं जात आहे. या सर्वाचा आता वीट यायला लागला आहे. याचे रिल्स येत आहेत त्यावर कोणीही काहीही बोलतंय, अशा शब्दांत राज्यातील राजकारणाबाबत त्यांनी खंत व्यक्त केली.

हे ही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

लोकांनी अनेक वर्षे महाराष्ट्राचं राजकारण पाहिलेलं आहे, असा महाराष्ट्र कोणी पाहिला नाही. ज्या महाराष्ट्रानं देशाचं प्रबोधन केलं त्या महाराष्ट्राचं प्रबोधन करायची वेळ आली आहे, अशी खंतही राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.